माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि भारतीय जनता पार्टी, अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवाराची बाजी, विजयाचा झेंडा रोवला.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक २०२१ या निवडणुकीत प्रभाग क्र. २ मधून अपक्ष उमेदवार सौ. ताई सचिन वावरे बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी अटीतटीच्या लढतीत अपक्ष उमेदवारांची बाजी लागलेली असून विजयाचा झेंडा रोवलेला आहे.
माळशिरस नगरपंचायत प्रभाग क्र. २ सर्वसाधारण जागेसाठी देशमुख रावसाहेब एकनाथ भारतीय जनता पार्टी, वावरे ताई सचिन अपक्ष, देशमुख अर्जुन महादेव अपक्ष, वावरे सचिन शिवाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वावरे महेश शिवाजी अपक्ष, वाघमोडे नवनाथ रामहरी भारतीय जनता पार्टी असे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननी होऊन उमेदवारांचे अर्ज वैध झालेले होते.
सोमवार दि. १०/०१/२०२२ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तीन वाजेपर्यंत वेळ होती. यामध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अपक्ष उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अपक्ष उमेदवार सौ. ताई सचिन वावरे बिनविरोध सदस्य होणार आहेत. माळशिरस नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंगळवेढा प्रांताधिकारी अण्णासाहेब समिंदर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी माळशिरस नगरपंचायत कैलास केंद्रे काम पाहत आहेत. औपचारिक घोषणा करण्याचे बाकी आहे.

तहसील कार्यालयापासून हलगीच्या निनादात फटाक्यांच्या आतिषबाजीत अपक्ष उमेदवार सौ. ताई वावरे यांचे पती सचिन वावरे यांनी वाजत-गाजत मिरवणूक काढली. माळशिरस शहरातील महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी बिनविरोध नगरसेवक सौ. ताई सचिन वावरे व किंगमेकर सचिन शिवाजीराव वावरे यांचे निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
महाळुंग चा निकाल कधी लागणार आहे