माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत 4 जागेसाठी 37 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाच्या आरक्षित असलेल्या जागेची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरित चार जागांची निवडणूक रणधुमाळी सुरु आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज सोमवार दिनांक 3/1/2022 अखेरचा दिवस होता 4 जागेसाठी 37 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केलेले आहेत.
प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण जागेसाठी देशमुख रावसाहेब एकनाथ भारतीय जनता पार्टी, वावरे ताई सचिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, देशमुख अर्जुन महादेव अपक्ष, वावरे सचिन शिवाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वावरे महेश शिवाजी अपक्ष, वाघमोडे नवनाथ रामहरी भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण जागेसाठी धाईंजे शोभा आबा भारतीय जनता पार्टी, पाटील संदीप शामदत्त भारतीय जनता पार्टी, थोरात विनोद विठ्ठल काँग्रेस आय, पवार अरुण महादेव अपक्ष, सावंत दादा कैलास बहुजन समाज पार्टी, धाईंजे विकास संदिपान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सावंत दत्तात्रय किसन अपक्ष, सावंत श्रीकांत नानासाहेब महाराष्ट्र विकास आघाडी, नलावडे प्रकाश सत्यवान अपक्ष, नलावडे सुमेध प्रकाश अपक्ष, खरात शंकर महादेव अपक्ष, सावंत सुमित राजू अपक्ष, धाईंजे शरद मधुकर अपक्ष, पवळ संजय विठ्ठल प्रहार जनशक्ती पक्ष, काळे रणजीत सोपान अपक्ष, प्रभाग क्रमांक 8 सर्वसाधारण महिला जागेसाठी जानकर कोमल वैभव भारतीय जनता पार्टी, जानकर अपर्णा सुमित भारतीय जनता पार्टी, जगताप सुलोचना सिताराम अपक्ष, वाघमोडे रंजना माणिक महाराष्ट्र विकास आघाडी, वाघमोडे राजश्री सर्जेराव महाराष्ट्र विकास आघाडी, टेळे प्रियंका धनाजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जानकर सुरेखा सर्जेराव अपक्ष, थोरात वैशाली राजू अपक्ष, टेळे शालन ज्ञानदेव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण महिला जागेसाठी देशमुख अर्चना आप्पासाहेब भारतीय जनता पार्टी, देशमुख सजाबाई एकनाथ भारतीय जनता पार्टी, वावरे ताई सचिन अपक्ष, काळे अनिता शहाजी अपक्ष, काळे सुप्रिया रणजीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, टेळे पूजा सचिन अपक्ष असे उमेदवारांनी प्रभाग निहाय अर्ज दाखल केलेले आहेत. उद्या 4/1/2022 रोजी सकाळी 11 वाजता छाननी होणार आहे. छाननी झाल्यानंतर सोमवार दिनांक 10/1/2022 रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तीन वाजेपर्यंत वेळ आहे. त्यादिवशी खरे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. माळशिरस नगरपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंगळवेढा प्रांताधिकारी अण्णासाहेब समिंदर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी माळशिरस नगरपंचायत कैलास केंद्रे काम पाहत आहेत. माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपकरत्न गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरसच्या सपकाळ परिवाराची हॉटेल व्यवसायातून मेडिकल व्यवसायाकडे वाटचाल.
Next articleप्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर व मित्रपरिवार यांचा तिरुपती बालाजी दौरा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here