माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांची निवड करण्यात आली तर बांधकाम समितीच्या सभापतीपदी उप नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. तसेच महिला बालकल्याण सभापती सौ. कोमल वैभव जानकर, उपसभापती सौ. पुनम आजिनाथ वळकुंदे, नगरसेवक विजय देशमुख, रघुनाथ चव्हाण, सौ. अर्चना देशमुख, सौ. ताई वावरे, सौ. मंगल गेजगे, सौ. प्राजक्ता ओवाळ आदी नगरसेवक उपस्थित होते.

सदर निवडीवेळी श्री. जगन्नाथ गेजगे, पै. रावसाहेब देशमुख, पै. गोरख देशमुख, पै. प्रशांत वाघमोडे, श्री. वैजनाथ वळकुंदे, श्री. आजिनाथ वळकुंदे, श्री. वैभव जानकर, श्री. सुमित जानकर, श्री. नाना चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. निवडी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng