माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आप्पासाहेब देशमुख यांचा दणदणीत विजय झाला आहे. माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आप्पासाहेब देशमुख व आबासाहेब धाईंजे यांच्यामध्ये लढत झालेली होती. नगरपंचायत कार्यालयांमध्ये पीठासन अधिकारी तथा तहसीलदार माळशिरस यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली. यामध्ये आप्पासाहेब देशमुख यांना दहा मते तर, आबासाहेब धाईंजे सात मते पडलेली आहेत.
आप्पासाहेब देशमुख यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केलेली आहे. देशमुख-देशमुख गट एकत्र झालेले असल्याने या निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. थोड्याच वेळात उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होऊन उपनगराध्यक्ष पदाचे दावेदार शिवाजीराव देशमुख यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng