Uncategorized

माळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध सौ. पूनम वळकुंदे यांची निवड…

माळशिरस तालुक्यात पहिल्यांदा महिला उपनगराध्यक्ष होण्याचा बहुमान सौ. पुनम अजिनाथ वळकुंदे यांना मिळाला

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदी बिनविरोध सौ. पुनम आजिनाथ वळकुंदे यांची निवड करण्यात आली आहे. माळशिरस तालुक्यात नातेपुते, महाळुंग, श्रीपुर व माळशिरस अशा तीन नगरपंचायत अस्तित्वात आहेत. नगराध्यक्ष महिला झालेल्या आहेत मात्र, तालुक्यात पहिल्यांदा महिला उपनगराध्यक्ष होण्याचा बहुमान सौ.पुनम अजिनाथ वळकुंदे यांना मिळाला आहे.

माळशिरस नगरपंचायत प्राधिकृत पिठाची अधिकारी तथा भूसंपादन क्रमांक (७) मोहोळचे उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक सभा आयोजित केली होती. यामध्ये सौ. पुनम अजिनाथ वळकुंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली होती. यावेळी विद्यमान नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम देशमुख, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पांडुरंग वाघमोडे, युवा उद्योजक व नगरसेवक सचिन वावरे, माजी नगरसेवक ज्येष्ठ नेते सुरेश वाघमोडे, मावळते उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत, युवा नेते संतोष वाघमोडे यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका तसेच नगरपंचायत मधील सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिनविरोध उपनगराध्यक्ष पदाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतीषबाजी, हालग्यांचा कडकडाट व गुलालाची उधळण करीत आनंद उत्सव साजरा केला.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका माजी अध्यक्ष व लोकराज उद्योग समूहाचे संस्थापक पांडुरंगतात्या वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आजिनाथ वळकुंदे यांनी सामाजिक कार्यातून राजकारणाकडे वाटचाल केलेली होती. गेल्या निवडणुकीत निसटता पराभव झालेला होता. तरीसुद्धा सामाजिक कार्य व सर्व सामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम सुरू होते. वेळोवेळी पांडुरंगतात्या वाघमोडे यांचे मार्गदर्शन व मोलाचे सहकार्य लाभत होते. सदरचा वार्ड महिलेसाठी आरक्षित झालेला होता‌. त्या ठिकाणी सौ. पुनम वळकुंदे यांनी दैदीप्यमान मताधिक्य घेऊन विजय संपादन केलेला होता. माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी नेते व कार्यकर्ते यांनी मिळून पदाचा फॉर्म्युला ठरवलेला होता. त्याप्रमाणे सौ. पुनम वळकुंदे यांना उपनगराध्यक्ष पदाचा बहुमान मिळालेला आहे. निश्चितपणे वार्डातील व माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीतील सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करून आपल्या कार्याचा ठसा उमटवतील असा विश्वास निकटवर्तीय यांच्याकडून व्यक्त केला जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort