माळशिरस नगरपंचायत उपनगराध्यक्ष पदासाठी शिवाजी देशमुख व पुष्पावती कोळेकर यांच्यात समोरासमोर लढत.

माळशिरस (बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक 2021-22 साठी नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांची बहुमताने निवड झाली आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी शिवाजी ज्ञानदेव देशमुख व सौ. पुष्पावती महादेव कोळेकर यांच्यात समोरासमोर लढत लागलेली आहे. माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत सतरा सदस्य त्यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे दोन, राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष एक, महाराष्ट्र विकास आघाडी दोन आणि अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल आहे. भाजपमध्ये तीन गट आहेत. त्यापैकी आप्पासाहेब देशमुख यांच्या सोबत भाजपचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस दोन, राष्ट्रवादी पुरस्कृत एक आणि अपक्ष दोन असे दहा सदस्य यांनी आप्पासाहेब देशमुख यांना नगराध्यक्ष पदासाठी मतदान केलेले आहे.

उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सुरू आहे. बारा ते दोन उमेदवारी अर्ज दोन नंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात 3:00 वाजता अंतिम निकाल जाहीर होणार आहे. पीठासन अधिकारी तथा माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर निवडणुकीचे काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य नगरपंचायतचे मुख्य अधिकारी कैलास केंद्रे करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article‘जलयुक्त’ शिवार घोटाळा; तीन निवृत्त अधिकाऱ्यांना अटक
Next articleमाळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख यांचा दैदिप्यमान विजय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here