माळशिरस नगरपंचायत कार्यालय जुन्या पंचायत समिती कार्यालयात सुरू करावे, जनतेची मागणी.

पालकमंत्री दत्तामामा भरणे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते यांनी पाठपुरावा करावा.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीचे तहसील कार्यालय शेजारी भव्य इमारत झालेली आहे. सदर ठिकाणी पंचायत समितीचे सर्व विभाग कार्यरत आहेत. त्यामुळे जुनी पंचायत समिती सध्या धूळ खात पडलेली आहे. माळशिरस नगरपंचायत कार्यालय जुन्या पंचायत समिती कार्यालयात सुरू करावी, अशी जनतेची मागणी आहे. यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांनी पाठपुरावा करावा अशी माळशिरसकरांची इच्छा आहे.

माळशिरस नगरपंचायत कार्यालयीन कामकाजासाठी अपुरे पडत आहे. इमारत छोटी असल्याने काम करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांनाही जागेची अडचण भासत आहे. गावामध्ये असल्याने दळणवळण व पार्किंगची सोय नाही. माळशिरस पंचायत समितीची जुनी इमारत नगरपंचायत कार्यालयासाठी उपयुक्त होऊ शकते. यामध्ये वेगवेगळ्या विभागाचे कामकाज होऊ शकते नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती यांना स्वतंत्र कक्षात बसून येणार्‍या लोकांच्या अडचणी सोडवता येतील‌. मुख्याधिकारी यांनाही प्रशासन लोकाभिमुख चालवण्यासाठी स्वतंत्र विभाग, मिटींग हॉल, सुसज्ज पार्किंगची सुविधा अशा सर्व गोष्टी आहेत. नव्याने करण्याची आवश्यकता नाही. भविष्यामध्ये नगरपंचायतीची नियोजित भव्य इमारत होईल तेव्हा होईल सध्यातरी नगरपंचायतीची अडचण सोडविण्यासाठी जुन्या पंचायत समितीमध्ये कार्यालय सुरू करणे गरजेचे आहे.

माळशिरस नगरपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आहे. भाजपचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख आहेत. त्यामुळे केंद्रात भाजप महाराष्ट्रात राष्ट्रवादी सत्तेत आहे. योगायोगाने भाजपचे खासदार व दोन आमदार आहेत तर राष्ट्रवादीचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे नगरपंचायतच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषद आणि वेळ प्रसंगी ग्रामविकास मंत्रालय येथे पाठपुरावा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून केल्यानंतर माळशिरस नगरपंचायतचा कारभार जुन्या पंचायत समितीमध्ये सुरु होऊन नागरिकांची अडचण दूर होईल अशी माळशिरसकरांची इच्छा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचा वर्धापन दिन आरोग्य शिबिराने साजरा
Next articleवेळापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांचा सन्मान संपन्न.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here