माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर.

नामनिर्देशन पत्र 14 /02/20 22 प्रत्यक्ष निवड सभा 18/02/2022 अकरा वाजता पीठासन अधिकारी तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची नियुक्ती.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केलेला आहे विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून माळशिरस तहसीलदार जगदीश निंबाळकर यांची नियुक्ती केलेली आहे.महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग यांचेकडील पत्र क्रमांक एमसीओ- 20 21 /प्र क्र 207/ नवी- 14 दिनांक 28/0 1/ 20 22 अन्वये माळशरस नगरपंचायतीचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी अडीच वर्षाकरिता राखीव ठेवण्यात आलेले आहे.मिलिंद शंभरकर जिल्हाधिकारी यांनी वक्त नियमांचे कलम 341 ब -1 पोट कलम ( 2 ) अन्वये प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करून या सूचनेद्वारे माळशिरस नगरपंचायतीच्या सर्व विद्यमान सदस्यांना कळवले आहे माळशिरस नगरपंचायतीची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ची विशेष सभा दिनांक 18 2 वीस-बावीस रोजी सकाळी 11 वाजता माळशिरस नगरपंचायत कार्यालय यात खालील अधिसूचित प्रमाणे आयोजित करण्यात येत आहे तसेच सदर विशेष सभेचे पीठासन अधिकारी म्हणून जगदीश निंबाळकर तहसीलदार माळशिरस यांची नियुक्ती केलेली आहे.नामनिर्देशन पत्र 14/0 2/ 2022 रोजी सकाळी अ11ते दुपारी 2 या वेळेत मुख्याधिकारी यांच्याकडे जमा केले जाणार दुपारी 2 नंतर त्याच दिवशी प्राधिकृत पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार नामनिर्देशन पत्रांची छाननी करून सायंकाळी पाच वाजता फेटाळण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्राची कारणासह यादी सूचना फलकावर प्रसिद्ध होईल. पाच नंतर वैद्य नामनिर्देशनपत्रांची सूचनाफलकावर मुख्याधिकारी प्रसिद्ध करतील. अपिलाचा कालावधी 14/0 2/ 2022 सायंकाळी 5 नंतर सुरू होईल. अपिलाचा अंतिम निर्णय आयुक्त व प्रादेशिक पुणे संचालक 16/02/ 20 22 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत राहील अपील निर्णयअंती वैद्य नामनिर्देशनपत्रांची सूचनाफलकावर मुख्याधिकारी 16/0 2/ 20 22 रोजी सायंकाळी 5 नंतर यादी प्रसिद्ध करतील. नामनिर्देशन मागे घेणे 17/0 2 /20 22 रोजी 11 ते 4 वाजेपर्यंत त्याच दिवशी पाच वाजता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी मुख्याधिकारी प्रसिद्ध करतील. प्राधिकृत पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार जगदीश निंबाळकर 18/0 2/ 2022 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक विशेष सभा घेणार आहेत असा निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleह.भ.प. एकनाथ महाराज हांडे पंढरपूरकर यांचे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.
Next articleसहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मोफत कॅन्सर निदान व उपचार शिबिराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here