माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आप्पासाहेब देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल.

माळशिरस शहराच्या विकासासाठी दोन देशमुख गट एकत्र येऊन सत्ता स्थापन.

माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष निवडीत भाजप व राष्ट्रवादी, अपक्ष यांचे मनोमिलन.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब एकनाथ देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी नगरपंचायत कार्यालय येथे दाखल करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, माजी नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे, अण्णासाहेब शिंदे, संतोषआबा वाघमोडे, विद्यमान नगरसेवक वस्ताद विजय देशमुख, श्रीनाथ विद्यालयाचे संचालक रावसाहेब देशमुख, युवानेते सुमित जानकर, विकासदादा धाईंजे, गोरख देशमुख आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत आप्पासाहेब देशमुख गटातील भारतीय जनता पार्टीतील पाच सदस्य, तुकारामभाऊ देशमुख गटातील राष्ट्रवादीचे दोन सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत एक सदस्य आणि अपक्ष दोन अशी ११ नगरसेवक यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नगराध्यक्ष पदासाठी आप्पासाहेब एकनाथ देशमुख तर उपनगराध्यक्ष शिवाजी ज्ञानदेव देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे.

माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळी दोन्ही देशमुख गट एकत्र आलेले असल्याने माळशिरस शहराच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय असल्याचे माळशिरसकरांमधून बोलले जात आहे. अनेक राजकीय विश्लेषकांना दोन्ही गट एकत्र आलेले असल्याने राजकीय विकासाची नांदी सुरु होणार आहे. शहरामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या निवडी होणार आहेत. दोन्ही पदासाठी उमेदवारी अर्ज कोण दाखल करीत आहे, याच्यावर ही पुढील रणनिती ठरणार आहे. सध्यातरी दोन्ही देशमुख गट एकत्र आलेले असल्याने माळशिरस शहराचे राजकारण नवीन वळणावर आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वराज्य रक्षक करिअर अकॅडमीचे प्रवीण घुले यांनी आर्थिक फसवणूक केली.- सौ. सुनिता संतोष बाबर.
Next articleआशा व गटप्रवर्तक यांचे थकित मोबदला व प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात तहसील कार्यालयात निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here