माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे आप्पासाहेब देशमुख, आबासाहेब धाईंजे आमने-सामने.

माळशिरस नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीकडे महाराष्ट्राचे लागले लक्ष

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आप्पासाहेब देशमुख व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आबासाहेब धाईंजे यांनी आपले उमेदवारी अर्ज कार्यकर्त्यांसमवेत शक्ती प्रदर्शनांमध्ये नगरपंचायत कार्यालय येथे दाखल केलेले आहेत.
माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज आज दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजी ११ ते २ या वेळेमध्ये नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्याकडे दाखल केलेले होते. सदर अर्जाची छाननी पीठासन अधिकारी कथा माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी करून सदरचे दोन्ही अर्ज वैध झालेले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार भारतीय जनता पक्षामधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी भाजपमध्ये आमने-सामने लढत लागलेली आहे.

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे दहा नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन व राष्ट्रवादी पुरस्कृत एक, महाराष्ट्र विकास आघाडी पुरस्कृत दोन नगरसेवक तर अपक्ष दोन नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे. भारतीय जनता पक्षाचे संख्याबळ आहे. मात्र, अंतर्गत एकमेकांचे नगराध्यक्ष पदासाठी सूत जुळलेले नसल्याने आप्पासाहेब देशमुख यांनी राष्ट्रवादी व अपक्ष यांच्यासमवेत आघाडी करून भाजपचा नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष असे ठरलेले आह. त्यामुळे दि. १७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज पाठीमागे घेण्याचा दिवस आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी पीठासन अधिकारी तथा तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची अकरा वाजता बैठक सुरु होऊन सदरच्या बैठकीमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच माळशिरसमध्ये नवा फॉर्मुला आमलात येणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये खळबळ माजलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleआशा व गटप्रवर्तक यांचे थकित मोबदला व प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात तहसील कार्यालयात निवेदन
Next articleसोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांचा खुडूस ग्रामस्थ यांच्या वतीने सन्मान.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here