माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत तीन पॅनलची समोरासमोर लढत, अपक्षसुद्धा नशीब अजमवणार.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायतची निवडणूक जाहीर झालेली आहे. पक्षापेक्षा स्थानिक आघाडीकडे उमेदवारांचा कल असल्यामुळे माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत समोरासमोर तीन पॅनल व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावतील असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे.
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत राजकीय पक्ष भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे, रासप, आरपीआय पक्ष काय भूमिका घेतील याकडे वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसह जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे. माळशिरस नगर पंचायत हद्दीत भाजप, राष्ट्रवादी, मनसे व रासप या पक्षाचे प्राबल्य आहे. भाजपची एक बैठक संपन्न झालेली आहे. इतर पक्षाचे धोरण गुलदस्त्यात आहे. माळशिरस नगरपंचायतीच्या गेल्या निवडणुकीत वेगवेगळ्या गटात बिगर पक्षीय निवडणुका लढलेल्या होत्या. त्यामध्ये अपक्ष यांनीसुद्धा बाजी मारलेली होती. सध्या देशात व महाराष्ट्रात पक्षीय राजकारणाला महत्त्व आहे, त्यामुळे भाजप व राष्ट्रवादी यांच्यामध्ये लढत होईल असे वाटत होते. परंतु, अद्यापतरी पक्षीय वातावरण शांत आहे. त्यामुळे स्थानिक आघाडीकडून निवडणूक लढण्याची शक्यता वाटत आहे. अपक्षसुद्धा दंड ठोकून आहेत त्यामुळे, माळशिरस नगरपंचायत निवडणूक रंगतदार होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसमाज प्रबोधनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पठारे कर्जतकर यांचे सुश्राव्य किर्तन.
Next articleप्रो. डॉ. सुभाष वाघमारे यांची प्रतीकात्मक कविता…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here