राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडाळीचा खेळ, तालुका अध्यक्ष यांना निवडणुकीत अपक्ष लढण्याची वेळ.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारासमवेत अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वार्ड क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादीचे तुकाराम रामचंद्र देशमुख व भाजपचे विजय बाजीराव देशमुख यांच्यात आणि वार्ड क्रमांक 16 राष्ट्रवादीच्या कांता सुरेश वाघमोडे व भाजपच्या पुष्पावती महादेव कोळेकर यांच्यात सरळ सरळ भाजप व राष्ट्रवादी आमने सामने लढत होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकराव वाघमोडे यांना राष्ट्रवादीच्या अंतर्गत बंडाळीचा खेळ त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत अपक्ष लढण्याची वेळ आलेली आहे. माळशिरस नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी व भाजप सरळ सरळ लढत असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
माळशिरस नगरपंचायतमध्ये सतरा प्रभागात निवडणूक जाहीर झालेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने नागरीकांचा मागास प्रवर्ग ओबीसी आरक्षण असलेल्या जागेच्या निवडणूका रद्द केलेल्या असल्याने माळशिरस नगरपंचायतमध्ये 13 जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले होते. सदरचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार माळशिरस यांनी अर्ज वैध केलेले आहेत.
प्रभाग क्रमांक १
१) काटे गणेश शिवाजी
२) गायकवाड आबासो दगडू
३) रोकडे सूर्यकांत मारुती
४) वामन कैलास महादेव
५) सावंत अनिल किसन – राष्ट्रवादी
६) सावंत आकाश भीमराव – भाजप
७) सावंत हर्षदा अनिल
प्रभाग क्रमांक ३
१) वळकुंदे धनश्री वैजिनाथ
२) वळकुंदे पुनम अजिनाथ
३) वाघमोडे अर्चना आप्पासाहेब
४) वाघमोडे लक्ष्मी महादेव – राष्ट्रवादी
५) वाघमोडे सुरेखा नवनाथ – भाजप
प्रभाग क्रमांक ४
१) देशमुख तुकाराम रामचंद्र – राष्ट्रवादी
२) देशमुख विजय बाजीराव – भाजप
३) देशमुख शिवाजी ज्ञानदेव
प्रभाग क्रमांक ६
१) आंबेडकर काजल विशाल
२) तुपसौंदर अशोक संतराम
३) तुपसौंदर महादेव अशोक
४) दरवेशी दुल्हनबी अजीज – राष्ट्रवादी
५) धाईंजे आबा आप्पा – भाजप
६) मदने बाबासाहेब दत्तात्रय
७) वाघमोडे माणिक एकनाथ
प्रभाग क्रमांक ७
१) काळे किरण तानाजी
२) काळी रामदास शिवाजी
३) टेळे रावसाहेब विष्णुपंत
४) टेळे सचिन महादेव – राष्ट्रवादी
५) देशमुख आप्पासाहेब एकनाथ – भाजप
प्रभाग क्रमांक ९
१) जाधव सुवर्णा रमेश
२) शिंदे राणी बबन – भाजप
३) शिंदे शोभा अविनाश
४) शिंदे स्वाती पांडुरंग – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक ११
१) टेळे रेश्मा सूर्यकांत
२) थिटे रोहिणी नितीनकुमार
३) देशमुख राणी अनिल – राष्ट्रवादी
४) देशमुख वनिता मारुती
५) पठाण सुरैय्या अमीर
६) बिदरे मसिरा अलमतीन – भाजप
७) शेख जुलेखा अब्दुल लतिफ
प्रभाग क्रमांक १२
१) ओहोळ प्राजक्ता शिवशंकर – भाजप
२) खंडागळे अंजली अनिल
३) जमदाडे मंगल हनुमंत – राष्ट्रवादी
४) धाईंजे विद्या सुरज
प्रभाग क्रमांक १३
१) घाडगे यशवंत दिनकर
२) घाडगे विशाल यशवंत
३) देशमुख अर्जुन महादेव
४) देशमुख शिवाजी ज्ञानदेव – राष्ट्रवादी
५) वाघमोडे नुतन सोमनाथ – भाजप
६) वाघमोडे सोमनाथ दामोदर
प्रभाग क्रमांक १४
१) केंगार कल्याणी नवनाथ
२) गेजगे मंगल जगन्नाथ
३) धाईंजे अर्चना विशाल
४) धाईंजे रंजना सुभाष – राष्ट्रवादी
५) सोनवणे प्रविणा तानाजी – भाजप
प्रभाग क्रमांक १५
१) केमकर मंगल दत्तात्रय – भाजप
२) पिसे निर्मला प्रकाश
३) पिसे पूजा सचिन
४) पिसे सोनाली अमोल – राष्ट्रवादी
प्रभाग क्रमांक १६
१) कोळेकर पुष्पावती महादेव – भाजप
२) वाघमोडे कांता सुरेश – राष्ट्रवादी
३) वाघमोडे मनीषा पांडुरंग
प्रभाग क्रमांक १७
१) चव्हाण रघुनाथ पांडुरंग – राष्ट्रवादी
२) चव्हाण रोहित रघुनाथ
३) वाघमोडे शामराव गेना
४) सिद आगतराव आप्पा
५) सिद गोपाळ भिकू
६) सिद रामचंद्र तुळशीराम – भाजप
७) सिद समाधान मल्हारी
या उमेदवारांनी अर्ज भरलेले मंजूर झालेले आहेत. यामध्ये काँग्रेस पक्षाचे तीन उमेदवार आहेत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांच्या धर्मपत्नी अपक्ष निवडणूक लढवत आहेत.
सोमवार दि. 13 रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे, या दिवशी खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng