माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे तुकाराम देशमुख व भाजपचे विजय देशमुख यांची लक्षवेधी लढत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टीचे वार्ड क्रमांक 4 मध्ये देशमुख-देशमुख आमने-सामने.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायतची निवडणूक चुरशीची असून पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत इतर पक्ष व अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र, नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे तुकाराम रामचंद्र देशमुख व भाजपचे विजय बाजीराव देशमुख यांची लक्षवेधी लढत ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी वार्ड क्रमांक 4 मध्ये देशमुख-देशमुख आमनेसामने निवडणूक लढवत आहेत.

माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणूकीत 17 जागांसाठी जाहीर झालेली होती. ओबीसीच्या 4 जागा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार निवडणूक प्रक्रियेतून वगळण्यात येऊन उर्वरित 13 जागांची निवडणूक सुरू झालेली आहे. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप व इतर पक्ष यांच्यासोबत अपक्ष सुद्धा निवडणूक लढवत आहेत. अनेक वॉर्डांमध्ये 3, 4, 5, 6 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र, वार्ड क्रमांक 4 मध्येच राष्ट्रवादीचे तुकाराम देशमुख व भाजपचे विजय देशमुख यांच्यात लढत लागलेली आहे.

राष्ट्रवादीचे तुकाराम देशमुख यांना स्व. बापूनाना देशमुख यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी माळशिरस पंचायत समितीचे सदस्य, माळशिरस शहराचे सरपंच पद उपभोगलेले आहे. तर भाजपचे विजय देशमुख यांना स्वर्गीय वस्ताद बाजीराव देशमुख यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या मातोश्री द्रोपदी देशमुख यांनी नगराध्यक्षपद उपभोगलेले आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांची समोरासमोर लढत लागलेली असून तेही देशमुख-देशमुख आमने-सामने असल्याने लक्षवेधी लढत ठरत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकाय राव ???… राहुलआप्पा तुमचा आमच्यावर भरोसा नाय का ? महाळुंगकर मतदारांचा सवाल.
Next articleभारतीय जनता पक्षाच्या कमळाकडे दोन रणजीतसिंह खासदार आणि आमदार लक्ष देणार का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here