माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलचे प्रमुख माणिकबापू वाघमोडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थितीत संपन्न.


माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे यांनी महाराष्ट्र विकास आघाडी पॅनल उभा केलेली आहे. माळशिरस चे ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवून महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ धुमधडाक्यात पॅनल प्रमुख माणिकबापू वाघमोडे शुभ हस्ते करण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे, एडवोकेट आप्पासाहेब वाघमोडे, एडवोकेट दादासाहेब पांढरे ,रशीद शेख ,शामराव वाघमोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


महाराष्ट्र विकास आघाडी पॅनलचे सर्व उमेदवार नेते व कार्यकर्ते यांनी भव्य शक्तिप्रदर्शन करीत वाजत गाजत रॅली काढून ग्रामदैवत हनुमान मंदिर येथे श्रीफळ वाढवला महाराष्ट्र विकास आघाडी पॅनल मधून प्रभाग क्रमांक 1 कैलास वामन प्रभाग क्रमांक 6 माणिकबापू वाघमोडे, प्रभाग क्रमांक 9 सुवर्णा रमेश जाधव, प्रभाग क्रमांक 11 रेश्माताई सूर्यकांत टेळे, प्रभाग 12 अंजली अनिल खंडागळे, प्रभात 17 आगतराव सिद असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, प्रचाराचा शुभारंभ करून प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतीय जनता पक्षाच्या कमळाकडे दोन रणजीतसिंह खासदार आणि आमदार लक्ष देणार का ?
Next articleनातेपुते नगरपंचायत निवडणुकीत जनशक्ती विकास आघाडीच्या रणरागिणीची प्रचारात आघाडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here