माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत लक्ष्मी दर्शन घेऊनही मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली.

निर्णायक मतदार मतदान न केल्याने उमेदवारांची आकडेमोड जुळवताना ताळमेळ लागेना.


माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत बलाड्या राजकीय नेते निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणुकीची रंगत व चुरस वाढलेली होती. उमेदवार यांनी मतदारांना खुश करण्याकरता लक्ष्मी दर्शन दिलेले होते मतदारांनी लक्ष्मी दर्शन घेऊन सुद्धा मतदानाकडे पाठ फिरवली असल्याने निर्णायक मतदार यांनी मतदान केल्याने उमेदवारांची आकडेमोड जुळवताना ताळमेळ लागेना असा धक्कादायक प्रकार उमेदवारांच्या मतांच्या बेरजेमध्ये मध्ये गणित जुळत नाही.
माळशिरस नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची झालेली होती यामध्ये राजकीय नेत्यांनी मतदारांना खुश करण्याकरता जेवणावळी कामाची आश्वासने प्रभागातील प्रलंबित कामे याची हमी देऊन लक्ष्मी दर्शन सुद्धा केलेले होते.
मतदारांनी लक्ष्मी दर्शन घेत असताना दोन्ही उमेदवारांकडून घेतलेले आहेत त्यामुळे मतदान करणाऱ्यांनी कोणाला मतदान केले त्याची कल्पना उमेदवारांना येत नाही मात्र लक्ष्मी दर्शन घेऊन मतदारांनी मतदान केले नाही यांच्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. एकतर दोन्हीकडून लक्ष्मी दर्शन घेतले असावे अथवा लक्ष्मी दर्शन घेतलेल्या दुसऱ्या उमेदवारा कडून दबाव आलेला असावा अशीही शक्यता असू शकते. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये उमेदवाराचे प्रतिनिधी मतदान यादीत मतदान केलेल्या लोकांच्या नावासमोर टिक मार्क करीत असतात. त्यामुळे मतदान कोणी केले उमेदवारांना समजत असत. निवडणुकीचा निकाल एक महिना पुढे गेलेला असल्याने उमेदवारांना आकडेमोड करण्यास वेळ मिळालेला आहे. आकडेमोडीत लक्ष्मी दर्शन घेतलेले मतदार यांचा हिशेब जुळत नसल्याने उमेदवार टेन्शनमध्ये आहेत. लक्ष्मी दर्शन घेताना देवासमोर बेलभंडारा, आणाभाका, परडी अशा साधनांचा वापर करून पक्के मतदान करून लक्ष्मी दर्शन केलेले होते. लक्ष्मी दर्शन मतदारांनी मतदान करून मोकळे होणे गरजेचे होते त्यांनी तसे न केल्यामुळे अंधारातील लक्ष्मी दर्शन उजेडात येण्याची शक्यता आहे कारण निवडणुकीत दारू पिणारे निवडणूक संपल्यानंतर चहा पिताना चर्चा सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणार्या समाजकंटकावर कठोर कारवाई करा- जिल्हाकार्याध्यक्षा मिनाक्षी जगदाळे
Next articleरोहितदादा पवार विचार मंचाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीनिवास कदम पाटील यांची नियुक्ती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here