माळशिरस नगरपंचायत प्रभाग क्रमांक दोन मधून सौ ताई सचिन वावरे व सचिन शिवाजीराव वावरे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीतील ओबीसी आरक्षणामुळे स्थगित झालेल्या चार जागांची निवडणूक रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रभाग क्रमांक दोन मधून युवा उद्योजक सचिनआप्पा शिवाजीराव वावरे व समाजसेविका सौ ताई सचिन वावरे आपले उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 3 /1/20 22 रोजी सकाळी अकरा वाजता भव्य शक्तिप्रदर्शन मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माळशिरस नगरपंचायत प्रभाग क्रमांक दोन मध्ये गेल्या दोन वर्षापासून सचिनआप्पा वावरे यांनी जनतेची सेवा केलेली आहे अडचणीच्या काळात लोकांना मदत केलेली आहे कितीतरी अडचणीची कामे स्वखर्चाने केलेली आहेत कोरोनाच्या संसर्ग रोगाने थैमान घातलेली होती अशा कठीण परिस्थितीत उद्योग व्यवसाय छोटे मोठे धंदे बंद होते सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली होती अनेक लोकांच्या हाताला काम नव्हते उपासमारीची वेळ आलेली होती अशावेळी सचिनआप्पा वावरे यांनी सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केलेले होते अनेक लोकांना दवाखाना औषध उपचार यासाठी सहकार्य केले होते अनेकांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले होते. वार्डातील रस्ते ,वीज, लाईट, पाणी यासाठी स्वखर्चाने कामे केलेली आहेत त्यामुळे सचिनआप्पा वावरे यांचा वार्ड म्हणजे एक कुटुंब बनलेले आहे सचिनआप्पा यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता मतदार स्वयंस्फूर्तीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता येण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे माळशिरस नगरपंचायत निवडणुकीसाठी शक्तीप्रदर्शन मध्ये मतदार सचिनआप्पा वावरे व ताई वावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. तरी सर्वांनी सचिनआप्पा वावरे यांच्या निवासस्थानी उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे असे आवाहन सचिनआप्पा वावरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng