भारतीय जनता पार्टीच्या पुष्पावती महादेव कोळेकर व अपक्ष सौ. मनीषा पांडुरंग वाघमोडे यांच्यात सरळ सरळ लढत.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक २०२१ नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. पुष्पावती महादेव कोळेकर व अपक्ष उमेदवार सौ. मनीषा पांडुरंग वाघमोडे यांची समोरासमोर लढत लागलेली आहे. कोळेकर यांचे कमळ चिन्ह आहे तर वाघमोडे यांचे शिट्टी हे चिन्ह आहे.
दोन्ही महिला उमेदवार उत्कृष्ट गृहिणी आहेत. त्यांचे पती सामाजिक, राजकीय व शैक्षणिक कार्यामध्ये कार्यरत आहेत.
सौ. पुष्पावती यांच्या पाठीशी असणारे पतिराज महादेव कोळेकर प्रगतशील व सामाजिक कार्यकर्ते आहेत. भारतीय जनता पार्टीची ताकद त्यांच्या पाठीशी आहे. सौ. मनीषा यांच्या पाठीशी पतिराज पांडुरंग वाघमोडे आहेत. पांडुरंग वाघमोडे यांनी भारतीय जनता पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष पद भूषविलेले आहे. तसेच त्यांनी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पदावर देखील काम केलेले आहे. लोकराज उद्योग समूहाच्या माध्यमातून ते शिक्षण संस्था, नवरात्र उत्सव असे अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असतात. त्यांना नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे यांची खंबीर साथ आहे.
प्रभाग क्रमांक 16 मध्ये 517 पुरुष व 440 स्त्री मतदार आहेत. दोनच उमेदवार असल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. त्यामध्ये सौ. पुष्पावती भाजपकडून लढत आहेत तर सौ. मनीषा अपक्ष लढत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng