माळशिरस नगरपंचायत मध्ये देशमुख पट्ट्याचा जाळ आणि धुर संगच निघालेला आहे.

माळशिरस नगरपंचायतमध्ये स्वर्गीय बापूनाना देशमुख व स्वर्गीय वस्ताद बाजीराव देशमुख यांची विचारधारा एकत्र येऊन भाजपचे आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख उपनगराध्यक्ष बनले आहेत.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीसाठी युगपुरुष बापूनाना देशमुख यांच्या विचाराचा वारसा जपणारे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकारामभाऊ देशमुख , महादेवतात्या देशमुख, दादासाहेब देशमुख,आणि पोलादीपुरुष वस्ताद बाजीराव देशमुख यांच्या विचाराचा वारसा जपणारे माळशिरस नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व विद्यमान नगरसेवक वस्ताद विजय देशमुख, रावसाहेब देशमुख दोन्ही गट एकत्र येऊन माळशिरस नगरपंचायत मध्ये स्वर्गीय बापूनाना देशमुख वस्ताद बाजीराव देशमुख यांची विचार धारा एकत्र येऊन भाजपचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख बनलेले असल्याने माळशिरस नगरपंचायत मध्ये देशमुख पट्ट्याचा जाळ आणि धुर संगच निघालेला आहे.
माळशिरस नगरपंचायत मध्ये माळशिरस तालुक्याच्या पंचक्रोशी मध्ये सर्वपरिचित असणाऱ्या देशमुख पट्ट्यातील नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख व उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख झालेले असल्याने माळशिरस शहरावर देशमुख शाही अस्तित्वात आलेली आहे.


माळशिरस नगरपंचायत 2021 – 22 पंचवार्षिक निवडणुकीत 17 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यापैकी भारतीय जनता पार्टीचे दहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन व राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष एक नगरसेवक, महाराष्ट्र विकास आघाडी पुरस्कृत दोन नगरसेवक तर अपक्ष दोन नगरसेवक असे पक्षीय बलाबल आहे.

माळशिरस नगरपंचायत मध्ये स्वर्गीय बापू नाना देशमुख व स्वर्गीय वस्ताद बाजीराव देशमुख यांची विचारधारा एकत्र येऊन भाजपचे आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्ष राष्ट्रवादीचे शिवाजीराव देशमुख उपनगराध्यक्ष बनले आहेत माळशिरस नगरपंचायत मध्ये देशमुख पट्ट्याचा जाळ आणि धुर संगच निघाला आहे.


माळशिरस शहरामध्ये स्वर्गीय बापूनाना देशमुख, आणि वस्ताद बाजीराव देशमुख यांनी राजकारण व समाजकारण करीत असताना सर्वसामान्य जनतेला व आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून आलेल्या नागरिकांना दिलासा होता आधार होता दोघांची विचारधारा जनहिताची होती. कधीही जनतेच्या हितासाठी एकमेकांनी एकमेकाचा शब्द मोडलेला नव्हता दोघांची विचारधारा वेगवेगळी होती मात्र समाजाचे हित हा एकच हेतू होता. समाजामध्ये दोघांनाही आदराचे स्थान होते. दोघांच्याही विचार धारेचा धागा पकडून तुकाभाऊ देशमुख गट व आप्पासाहेब देशमुख गट एकत्र येऊन नगरपंचायत मध्ये सत्ता स्थापन केलेली आहे.
माळशिरस पंचक्रोशी मध्ये स्वर्गीय बापूनाना देशमुख व स्वर्गीय बाजीराव देशमुख यांच्यामुळे देशमुख पट्ट्याची वेगळी ओळख आहे सामाजिक कार्यात अग्रेसर ओळखला जाणारा देशमुख पट्टा यांची महाराष्ट्राला राजकारणात ही वेगळी ओळख नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीच्या वेळी पहावयास मिळालेली आहे त्यामुळे देशमुख पट्ट्याचा जाळ आणि धूर संगच निघालेला असल्याचे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपुण्यातील खराडी मध्ये गोदरेजच्या स्काय ग्रीन प्रकल्पात फ्लॅट घेण्याची अकलूज मधून सुवर्णसंधी.
Next articleजि.प. सदस्या ज्योतीताई पाटील यांच्या फंडातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here