माळशिरस पंचायत समितीचा प्रशासनातील स्वच्छ कारभार आणि अधिकाऱ्यांच्या स्वागताने गटप्रमुख अनिल पाटील यांची टीम गेली भारावून

माळशिरस ( बारामती झटका )

सोलापूर जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिलीप स्वामी यांच्या कार्यकौशल्य प्रशासनातील योग्य नियोजन, सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडलेल्या आहेत. सर्वच तालुक्यातील गटविकास अधिकारी व त्यांच्या टीमने पंचायती राज समितीला सर्व कागदपत्रे उपलब्ध करून तीन तास चर्चा मस्त करून सोलापूर जिल्ह्यातील पंचायती राज समिती प्रमुख आमदार संजय रायमुलकर यांचा यशस्वी दौरा संपन्न झालेला आहे.


माळशिरस पंचायत समितीच्या प्रशासनातील स्वच्छ कारभार आणि अधिकाऱ्यांच्या स्वागताने गटप्रमुख अनिल पाटील यांची टीम भारावून गेलेली होती.


माळशिरस पंचायत समिती यांच्यावतीने पंचायती राज समितीचे जंगी स्वागत करण्यात आले. गटप्रमुख आमदार श्री. अनिल पाटील त्याचबरोबर सदस्य श्री. देवराव होळी, श्री. सदाभाऊ खोत, श्री. किशोर दराडे, श्री. प्रदीप जयस्वाल आदी पाच आमदार सदस्यांची कमिटी माळशिरस पंचायत समितीमध्ये आलेली होती.


पंचायती राज समितीच्या सर्व सदस्यांना हलगीच्या निनादात पंचायत समिती कार्यालयाच्या गेटपर्यंत आणण्यात आले. महिला भगिनींनी सर्व सदस्यांना औक्षण करून स्वागत केले.
माळशिरस तालुक्याचे लोकप्रतिनिधी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील व प्रतापराव पाटील यांनी तालुक्याच्यावतीने गट प्रमुख श्री. अनिल पाटील व सदस्यांचा सन्मान केला.

माळशिरस पंचायत समितीच्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात माळशिरस पंचायत समितीच्या वतीने गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी गटप्रमुख आ. अनिल पाटील यांचा सन्मान केला.


तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ‌. रामचंद्र मोहिते, गट शिक्षण अधिकारी धनंजय देशमुख, उप अभियंता अशोकराव रणनवरे, वैद्यकीय अधिकारी शहाजी ठवरे, एम. बी. कमळे सह विभाग प्रमुख यांनी उर्वरित समितीतील सदस्यांचा सन्मान केला.
माळशिरस पंचायत समितीच्या सन 2015-16 व 2016-17 च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवाल आणि सन 2017-18 च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या अनुषंगाने कामकाजाची चौकशी करून माहिती देण्यात आली.

तत्कालीन गटविकास अधिकारी श्री. तानाजी लोखंडे, सेवानिवृत्त उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. सुरेश मारकड, चारही उप अभियंता व श्री. व्यवहारे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. गटविकास अधिकारी श्री. श्रीकांत खरात यांनी योग्य नियोजन केलेले होते‌. त्यांनी गेल्या दहा महिन्यात गतिमान पंचायत समितीचा कारभार केलेला असल्याने त्याचा फायदा पंचायती राज समितीच्या वेळी झालेला आहे.


गटप्रमुख आमदार श्री. अनिल पाटील, आ. श्री. देवराव होळी, आ. श्री. सदाभाऊ खोत, आ. श्री. किशोर दराडे, आ. श्री. प्रदीप जयस्वाल आदी सदस्यांनी तालुक्यातील ग्रामस्थांची तक्रारीची निवेदने घेऊन त्यावर सखोल चर्चा केलेली आहे.


माळशिरस पंचायत समितीच्या परिसराची साफसफाई करून परिसर स्वच्छ केलेला आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या मुख्य गेटपासून दुतर्फा रांगोळी काढून प्रवेशासाठी बाणाच्या खुणा केलेल्या होत्या. वाहन पार्किंगसाठी चौकोन आखलेले आहेत. मुख्य प्रवेशद्वारापासून पायघड्या अंथरण्यात आल्या‌ होत्या. स्वागताची जय्यत तयारी केलेली होती. सुबक आणि आकर्षक रांगोळी श्रीमती गिरिजा नाईकनवरे व शहजादी काझी मॅडम यांनी काढलेली होती. हि रांगोळी डिजिटल असल्यासारखी वाटत असल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रशांत सरूडकर यांनी केलेले होते.


पंचायती राज समिती गटप्रमुख आमदार श्री. अनिल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधून सविस्तर चर्चा करून याचा अहवाल जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासनाला देणार असल्याचे सांगितले होते.


जिल्हा परिषद सोलापूर येथून पंचायती राज समिती प्रमुख आमदार संजय रायमुलकर यांनी यशस्वीपणे दौरा सध्यातरी केलेला आहे. मात्र, मंत्रालयात लाल लखोट्यात काय दडलंय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


कार्यक्रमाचे सर्व छायाचित्रण फोटोग्राफर शशिकांत म्हमाणे, माळशिरस यांनी केलेले होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजांबुड सेवा सोसायटीच्या बिनविरोध चेअरमनपदी राहुल खटके तर, व्हाईस चेअरमनपदी प्रकाश जयवंत यांची निवड.
Next articleकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी हात झटकले, विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी असे काय मागितले ??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here