शासकीय दुखवटा असताना व ग्रामपंचायतची मालकी हक्क नसताना अतिक्रमणाच्या नोटिसा काढणे पडणार महागात.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी मेडद ता. माळशिरस येथील ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब यांना तक्रारीच्या अनुषंगाने सात दिवसात खुलासा सादर करण्याची नोटीस देऊन सदर नोटीसच्या प्रती तक्रारदार यांना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शासकीय दुखवटा व ग्रामपंचायतची मालकी हक्क नसताना अतिक्रमणाच्या नोटिसा काढणे महागात पडणार, असे पंचायत समितीच्या कार्यवाहीची सुरुवात झालेली असल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

मेडद ता. माळशिरस येथील ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी दिलेल्या होत्या. सदरच्या तक्रारींमध्ये दि. 07/02/2022 रोजीचा शासकीय दुखवटा निर्णय डावलून ग्रामपंचायतीचा मालकीहक्क नसताना ग्रामसेवक यांनी अतिक्रमण काढणेबाबत नोटीस दिली आहे. त्यासंबंधी त्यांच्यावर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, असे तक्रारी अर्ज दिलेले होते. त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी संबंधित ग्रामसेवक चव्हाण भाऊसाहेब यांना सात दिवसात खुलासा करण्याची नोटीस दिली आहे. मेडद ग्रामस्थ व तक्रारदार यांची दखल पंचायत समितीने घेतलेली असल्याने पुढील निर्णय काय होतो, याकडे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng