माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी विस्ताराधिकारी व्ही. बी. कोळेकर यांच्याकडे चौकशी व अहवाल सादर करण्याचे दिले आदेश.

जळभावी गावचे सरपंच किसन रामा राऊत यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर गटविकास अधिकारी यांच्या कार्यवाहीला सुरुवात.

सरपंचाची बनावट सही करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याची मोहीम, विस्ताराधिकारी व्हि. बी. कोळेकर यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्याकडे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजनेअंतर्गत मासिक सभेत ठराव न घेता व डुप्लिकेट सही करून प्रस्ताव सादर केले. याबाबत सरपंच किसन रामा राऊत यांनी तक्रार देऊन उपोषणाचा इशारा दिलेला होता. उपोषणाच्या इशाऱ्यानंतर गटविकास अधिकारी यांनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. बी. कोळेकर यांच्याकडे चौकशी व स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत. सरपंच यांच्या अर्जाची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांच्या कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे. सरपंचाची बनावट सही करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या मोहीमेवर विस्ताराधिकारी व्ही. बी. कोळेकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. अहवालाकडे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.

माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे सरपंच किसन रामा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये, जळभावी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच किसन रामा राऊत यांनी माळशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन बनावट सही करून गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. बनावट सही करणाऱ्या इसमावर फौजदारी गुन्हा दाखल करून ग्रामसेवक पी.बी. काळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, असे पत्र दिलेले असून सदर निवेदन पत्राच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर, उप विभागीय आयुक्त महसूल शाखा पुणे, राष्ट्रीय अपराध ब्युरो उत्तर प्रदेश प्रधान कार्यालय, माळशिरस पोलीस स्टेशन येथे दिलेल्या आहेत.
जळभावीचे सरपंच किसन रामा राऊत यांनी दिलेल्या निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले होते कि, मौजे जळभावी गावामध्ये माझी बनावट सही करून विकास कामांचे बेकायदेशीर प्रस्ताव दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. व तो उघड देखील झालेला आहे. याप्रकरणी खोटी सही करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे. सदर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेले ग्रामसेवक पी.बी. काळे यांच्यावर देखील प्रशासकीय कारवाई होणे आवश्यक आहे. बनावट सही करून दाखल केलेल्या प्रस्तावातील सूचक व अनुमोदक म्हणून श्री. आबासाहेब सूळ व आशाबाई राऊत यांच्या सह्या आहेत. अशा परिस्थितीत माझ्या बनावट सहीने आपल्या कार्यालयांमध्ये अनेक प्रस्ताव व व्यवहार झाले असण्याची शक्यता आहे. शिवाय काही आर्थिक गैरव्यवहार देखील झालेले असण्याची शक्यता आहे. तरी माझी विनंती की, माझ्या बनावट सहीने आपल्या कार्यालयांमध्ये दाखल केलेल्या प्रस्तावाची चौकशी होऊन संबंधित इसमावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. आपणाकडून पंधरा दिवसाचे आत योग्य ती कारवाई न झाल्यास मी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. त्यावेळी होणारे परिणामास तुम्ही सर्वस्वी जबाबदार रहाल याची नोंद घ्यावी, असे निवेदन पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिले होते.

माळशिरस पंचायत समितीमध्ये अनेक प्रस्ताव दाखल झालेले आहेत. किसन रामा राऊत यांनी सदरचे प्रकरण उघड केलेले आहे. वास्तविक पाहता असे गैरप्रकार किती असतील असा संशय निर्माण होत आहे. सदरच्या प्रस्तावावर बनावट सही करणाऱ्या इसमावर कारवाई केल्यानंतर अजून कोठे बनावट काही केले आहे का, याचीही माहिती उघड होईल. यासाठी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन चौकशी करावी अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे. यासाठी बारामती झटका वेबपोर्टलवर सरपंचाची बातमी प्रसारित केल्यानंतर सदरच्या प्रकरणाला वाचा फुटली आहे. लवकरच सदरच्या प्रकरणाची व्ही. बी. कोळेकर कसून चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करतील याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविहिरीचे बिल काढण्यासाठी पंचायत समितीमधील लाचखोर विस्तार अधिकाऱ्यास रंगेहात पकडले.
Next articleना.नवाबजी मलिक यांच्यावर जाणून बुजून व राजकीय सूडबुद्धीच्या केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here