माळशिरस पंचायत समितीचे गटनेते रणजितसिंह जाधव यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न होणार – उद्योजक मोहितशेठ जाधव पाटील

वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा, मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिर, भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन…

मळोली (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समितीचे माजी गटनेते मळोली गावचे माजी सरपंच युवानेते रणजीतसिंह जयसिंगराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिर, भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा, मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिर तसेच भव्य नागरी सत्काराचे आयोजन केले असल्याचे आयोजक फ्लोरा फर्निचर उद्योग समूहाचे संस्थापक उद्योजक मोहितशेठ जाधव पाटील यांनी सांगितले.

युवा नेते रणजीतसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दि. 14/03/2023 रोजी सकाळी 09 वाजता भव्य रक्तदान शिबिर मळोली विविध कार्यकारी सेवा सोसायटी येथे होणार आहे. रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेणाऱ्या रक्तदात्यांना पाच लिटर कुकर किंवा पाण्याचा जार भेटवस्तू म्हणून देण्यात येणार आहे. सायंकाळी 08 वाजता भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन मळोली वेळापूर रोडवरील जनता विद्यालय व जुनिअर कॉलेज मळोली येथे होणार आहे. सदरच्या भव्य डान्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक 10001/- फ्लोरा फर्निचर उद्योग समूह मोहितशेठ जाधव पाटील, द्वितीय क्रमांक 7001/-रणजीत बापू युवा मंच व राजाभाऊ जाधव, तृतीय क्रमांक 5001/- श्री. ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव श्री. माऊली जाधव, उत्तेजनार्थ 3001/- कै. भानुदास रामचंद्र जाधव यांचे स्मरणार्थ श्री. संतोष भानुदास जाधव अशी बक्षिसे राहणार आहेत.

बुधवार दि. 15/03/2023 रोजी रणजीतसिंह जाधव यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य नागरी सत्काराचे आयोजन सकाळी 09 वाजता करण्यात आलेले आहे. शुक्रवार दि. 16/03/2023 रोजी सकाळी 09 वाजता बुधरानी हॉस्पिटल पुणे यांच्या नियोजनातून मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिर ग्रामपंचायत कार्यालय मळोली येथे संपन्न होणार आहे. तरी वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन फ्लोरा उद्योग समूह, रणजीतबापू युवा मंच, समस्त मळोली ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रतिष्ठित गाव कण्हेर ग्रामपंचायतीचा गड राखण्याकरता नेते व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न…
Next articleमहिलांनी कुटुंबाबरोबरच स्वतःच्याही आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे – प्रा. सौ. मीनाक्षी जगदाळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here