माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांना वाढदिवसानिमित्त कार्यालयांमध्ये शुभेच्छा देण्यात आल्या. त्यावेळी स्वर्गीय राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील दिव्यांग संस्था तथा प्रहार संघटना तालुका अध्यक्ष गोरक जानकर, दत्ताभैय्या तरंगे, कचरेवाडीचे युवा नेते दादासाहेब जानकर, प्रकाशबापू वाघमोडे, विष्णुपंत वाघमोडे, ऋतुराज शिंदे आदी मान्यवर यांनी सन्मान केला. यावेळी कार्यालयीन अधिक्षक कदम साहेब उपस्थित होते.
माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी माळशिरस पंचायत समितीमध्ये पदभार घेतल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस आलेला आहे. त्यांच्यावर अनेक स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्रीकांत खरात यांना प्रशासनामध्ये दांडगा अनुभव आहे. त्यांनी पदभार घेतल्यापासून पंचायत समितीचा कारभार गतीमान झालेला आहे. ग्रामीण भागातून येणारे नागरिक आणि लाभार्थी यांचे समाधान होत असल्याने श्रीकांत खरात यांच्या कार्याविषयी प्रशासनाविषयी जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng