माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांची पदोन्नती झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदी विनायक गुळवे यांची नियुक्ती.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा दर्जा असणाऱ्या नगर पंचायत समितीमध्ये बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या गटविकास अधिकारी पदी विनायक गुळवे यांनी श्रीकांत खरात यांचेकडून पदभार स्वीकारला आहे.

श्री विनायक जगन्नाथ गुळवे यांनी 1993 साली विस्तार अधिकारी या पदावर पंचायत समिती, शिरूर येथे प्रशासनात नोकरीला सुरुवात केलेली होती. त्यानंतर विस्तार अधिकारी म्हणून इंदापूर येथे सात वर्ष, बारामती येथे अकरा वर्ष, दौंड येथे चार वर्ष असे काम केलेले आहे. त्यांना सहाय्यक गटविकास अधिकारी बढती मिळाल्यानंतर त्यांनी पंचायत समिती, दौंड येथे साडेचार वर्ष व इंदापूर पंचायत समिती येथे अडीच वर्ष नोकरी केलेली आहे. फलटण पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असताना त्यांचे गटविकास अधिकारी पदावर पदोन्नती होऊन माळशिरस पंचायत समिती येथे शासनाने नियुक्त केले होते.

माळशिरस पंचायत समितीमध्ये पंचायती राज समिती दौरा नियोजित असल्यामुळे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्यावरच डॉ. दिलीप स्वामी यांनी जबाबदारी दिलेली होती. माळशिरस पंचायत समितीमध्ये गेल्या दहा महिन्यापूर्वी श्रीकांत खरात यांनी पदभार घेतलेला होता. त्यांनी त्यांच्या कालावधीमध्ये माळशिरस पंचायत समितीचा गतिमान व स्वच्छ कारभार केलेला होता. गेल्या दोन महिन्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा कालावधी संपलेला असल्याने सध्या गटविकास अधिकारी श्रीकांत खरात प्रशासक म्हणून काम पहात होते. शिस्तप्रिय व प्रशासनातील दांडगा अनुभव असणारे श्रीकांत खरात यांनी कमी कालावधीमध्ये माळशिरस तालुक्यात स्वकार्यातून सर्वसामान्य जनतेच्या मुखामध्ये नाव ठेवलेले आहे.

नूतन गटविकास अधिकारी यांचासुद्धा प्रशासनातील दांडगा अनुभव असल्याने ते माळशिरस पंचायत समितीचा कारभार योग्य पद्धतीने हाताळतील, असा विश्वास प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना आहे.

माळशिरस शहरातील पिनू दोशी, एल. डी. वाघमोडे, श्रीमंत बनकर, तानाजी वाघमोडे, संजय हुलगे, स्वप्निलकुमार राऊत आदी पत्रकारांच्यावतीने मावळते गटविकास अधिकारी श्रीकांत खरात व नवनियुक्त गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांचा सन्मान करण्यात आला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
