तरंगफळ ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी तरंगफळ येथील श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त मंदिरास सदिच्छा भेट घेऊन दर्शन घेतले. यावेळी उपसभापती यांचा सन्मान तरंगफळचे लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे, यांनी ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतीने केला.
यावेळी माजी सरपंच भागवत तरंगे, मधुकर तरंगे, रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महादेव तरंगे, माजी सरपंच सुजित तरंगे, श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष गोरख जानकर, शशिकांत साळवे, सारंग ठवरे, गोविंद कांबळे, सुरक्षा रक्षक, यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng