माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य हनुमंतराव लावंड यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन.

विजयवाडी गावचे पहिले सरपंच हनुमंतराव भाऊराव लावंड यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

अकलूज ( बारामती झटका )

विजयवाडी ता. माळशिरस गावचे पहिले सरपंच व माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य हनुमंतराव भाऊराव लावंड यांचे आज शनिवार दि. 24/12/2022 पहाटे 5 वाजता वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, भाऊ, भावजया असा परिवार आहे. त्यांच्यावर विजयवाडी येथील निवासस्थानाशेजारील शेतामध्ये शोकाकुल वातावरणामध्ये आज सकाळी 10 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत.

विजयवाडी ग्रामपंचायत 1975 साली स्थापना झालेली आहे. हनुमंतराव लावंड उर्फ दादा यांनी स्थापनेपासून 25 वर्ष 2000 सालापर्यंत गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळलेली होती. माळशिरस पंचायत समितीचे सदस्य पदावर अकरा वर्षे काम केलेले आहे. विजयवाडी गावच्या जडणघडणीमध्ये दादांचा सिंहाचा वाटा आहे. गावच्या अनेक मूलभूत सुविधा त्यांनी त्याकाळी केलेल्या होत्या. सर्वांशी मिळून मिसळून वागणं, बोलका स्वभाव असल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या अडचणी ते कायम सोडवत असत.

दादांची चार मुले प्रगतशील बागायतदार बाळासाहेब, विजयवाडी गावचे पोलीस पाटील अनिल, सिव्हिल इंजिनियर रवींद्र, आरटीओ प्रतिनिधी शशिकांत अशी आहेत. मुलगी वंदना दिघी येथील निंबाळकर घराण्यामध्ये दिलेली आहे. दादांची सासरवाडी जगदाळे चारे बार्शी येथील आहे. दादांचे आजोळ जाधव मळोली येथील आहे. विजयवाडी व मळोली दोन्ही गावावर शोककळा पसरलेली आहे. दादांवर अंत्यसंस्कार करतेवेळी विजयवाडी पंचक्रोशीतील, अकलूज, पानीव, खुडूस, निमगाव, विझोरी, चौंडेश्वरवाडी, यशवंतनगर, अकलूज, मळोली, वडापुरी, उदमाईवाडी, दिघी आदी गावातील मित्रपरिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम सोमवार दि. 26/12/2022 रोजी सकाळी 7.30 वाजता होणार आहे. दादांच्या मृतात्म्यास शांती लाभो व लावंड परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो हीच बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली…

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस तालुक्यातील भाजपच्यावतीने पिसेवाडीचे नूतन ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांचा सन्मान संपन्न.
Next articleशायनिंग महाराष्ट्र २०२२ महाप्रदर्शनाचा शानदार समारोप…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here