निकमवाडी येथील श्री गणेश कन्स्ट्रक्शनचे आर. डी. माने यांच्या हॉटमिक्स डांबर प्लाॅन्टचा शुभारंभ.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती जलनायक अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दि. 20/11/2021 रोजी स. 9.30 वा. निकमवाडी खुडूस येथील श्री गणेश कन्स्ट्रक्शनचे रामचंद्र दशरथ माने उर्फ आर. डी माने. यांच्या हॉटमिक्स डांबर प्लाॅटचा शुभारंभ होणार आहे.
निकमवाडी येथील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब असणारे श्री. दशरथ खंडू माने व सौ. जनाबाई दशरथ माने यांना रामचंद्र आणि लक्ष्मण ही दोन मुले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत नावामध्येच राम-लक्ष्मण असणाऱ्या या रामलक्ष्मणाच्या जोडीने परिस्थितीवर मात करून आई वडिलांनी केलेले काबाड कष्ट, वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतात राबून आपली मुले शिक्षित केलेली आहेत. मुलांनीही स्वतःची जिद्द, चिकाटी, गरिबीची जाणीव यामधून रामचंद्र दशरथ माने यांनी इंजिनिअर पदवी प्राप्त केलेली आहे. लक्ष्मण सध्या नगरपालिका मुंबई येथे सिव्हील इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. रामचंद्र यांनी कन्स्ट्रक्शन व्यवसाय सुरू करून डांबर प्लाॅन्टची उभारणी केलेली आहे.
रामचंद्र दशरथ माने उर्फ आर. डी. माने यांनी पहिली ते चौथी निकमवाडी व सातवीपर्यंत डोंबाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलेले आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण महालिंगेश्वर, खुडूस येथे पूर्ण केलेले आहे. इंजिनीयर पदवी लातूर येथील एम. एस. बिडवे या विद्यालयात पूर्ण केलेली आहे. 2009 साली त्यांनी प्रत्यक्ष कन्स्ट्रक्शनला सुशिक्षित बेरोजगार ( सुबे ) छोटी मोठी कामे करण्यास सुरुवात केली. 2015 साली श्री गणेश कन्स्ट्रक्शनची स्थापना केली. अनेक कामे करून अनुभव मिळविला आणि स्वतःच्या श्री गणेश कन्स्ट्रक्शन हॉट मिक्स डांबर प्लाॅन्टची उभारणी केलेली आहे. त्यांना आई-वडिलांसोबत चुलते, चुलत भाऊ व नातेवाईक यांचे मार्गदर्शन लाभले. कन्स्ट्रक्शनमध्ये अनेक मित्रांचे सहकार्य लाभले. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी प्लाॅन्टची उभारणी केलेली आहे. तरी सदरच्या कार्यक्रमास नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माने परिवार यांचेकडून करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng