माळशिरस पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ७५ लाभार्थींना विजयदादांच्या हस्ते कोंबडी पिल्लांचे वाटप

अकलूज (बारामती झटका)

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत ५०% अनुदानावरती गट वाटप योजने अंतर्गत १०० एक दिवसीय कुक्कुट पिलांचे वाटप राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माळशिरस पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या योजनेची माहिती देताना तालुका पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ. भास्कर पराडे पाटील म्हणाले, माळशिरस तालुक्यातील एकूण मंजुर लाभार्थी संख्या ७५ गट असून
एका लाभार्थीस २००० रुपये किमतीची पिल्ले व खाद्य अनुदान रक्कम रुपये ६०००/- असे एकूण रुपये ८000/- चे अनुदान एका लाभार्थीस दिले जाते. तालुक्यामध्ये ७५ गटाला प्रत्येकी १०० पिल्ले याप्रमाणे ७५०० पिल्ले वाटप करणेत आली असून त्याची रक्कम रुपये १,५०,०००/- एवढी होत आहे व खाद्य अनुदान रुपये ४,५०,००० एवढे वाटप करण्यात आले आहे. असे एकूण पिल्लाचे व खाद्यांचे अनुदानाचे ६ लाख वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी सभापती बाळासाहेब होले,भारतीय जनता पार्टी किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सरगर, बाळासाहेब वावरे, पंचायत समिती सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य सुनंदाताई फुले, पंचायत समिती सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील, नानासाहेब नाईकनवरे, मानशिंग मोहिते, हेमलता चांडोले, शिवामृत दुध संघांचे संचालक लक्ष्मण पवार, माऊली सूळ, शंकर सहकारी कारखान्याचे संचालक संजय कोरडकर, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, पूरंदावडेचे सरपंच देविदास ढोपे, जाधववाडीचे सरपंच शिवाजी जाधव, मेडद उपसरपंच शिवाजी लवटे, कोंडबावीचे सरपंच विष्णू घाडगे, विजय गोरड, युवराज देशमुख, शिवराज निंबाळकर, दीपक माने, पिंटू वावरे, बाळासाहेब फुले, मछिंद्र कर्णवर, राजू रोगे, संजय देशमुख, दादा पाटील, तानाजी वाघमोडे, डॉक्टर पराडे, बांधकाम उपअभियंता अशोक रणनवरे, मुलाणी व लाभार्थी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. राजेंद्र मगर यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार जाहीर
Next articleनॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्यस्तरीय दुसरे महाअधिवेशन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here