माजी सभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, प्रतापराव पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांच्यासह अनेकांची उपस्थिती.
कोथळे ( बारामती झटका )
सातारा व सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणारे शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव अनेक भाविक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. चैत्र महिन्यात शंभू महादेवाला महाराष्ट्रातून व महाराष्ट्राबाहेरून कावडी व भाविक दर्शनासाठी येत असतात. शिखर शिंगणापूर येथे मानाची असणारी तेल्या भुत्याच्या कावडीचे स्वागत माळशिरस पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले.

यावेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, प्रतापराव पाटील, गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते, युवा नेते संताजी देशमुख, पुरंदावडे गावचे सरपंच देविदास ढोपे, मोरोचीचे माजी उपसरपंच माऊली सुळ पाटील, शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवराज उर्फ भैय्या निंबाळकर, मोरोची गावचे युवा नेते दीपक माने, बांधकाम कामगारांचे तारणहार अरविंद भोसले, जिल्हा परिषद बांधकाम उप अभियंता अशोकराव रणनवरे, शाखा अभियंता रणनवरे, देवकर, बाबर, बोराटे, विस्तार आधिकारी कोळेकर, खरात, सरपंच दिपाली गुरव, संतोष गुरव, शंकर बर्वे, पांडुरंग माने, ग्रामविकास अधिकारी रवींद्र पवार, ग्रामसेवक काळे, गोरे, मोरे, पी. बी. काळे, गायकवाड, रुपनवर आदींसह कोथळे गावातील ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng