माळशिरस पंचायत समितीच्या आवारात दसऱ्याच्या मुहूर्तावर दिव्यांग कक्षाची स्थापना

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस शहरात पंचायत समितीच्या आवारात महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या आशीर्वादाने आज दि. ५/१०/२०२२ रोजी दिव्यांग बांधवांच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पंचायत समितीच्या आवारात दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली. यावेळी हृदयसम्राट मदनसिंह मोहिते पाटील यांच्या प्रेरणेतून विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती शोभाताई साठे, माजी उपसभापती प्रताप पाटील, माजी गट विकास अधिकारी श्रीकांत खरात, नूतन गट विकास अधिकारी विनायक जी. गुळवे या सर्वांच्या सहकार्याने दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याचे दिव्यांगांचे दैवत बच्चूभाव कडू यांचे दिव्यांगांना नेहमीच सहकार्य असते. महिला जिल्हा अध्यक्ष संजीवनीताई बारंगुळे, शहाजी देशमुख जिल्हा संपर्क प्रमुख  प्रहार संघटना, गोरख जानकर माळशिरस तालुका अध्यक्ष, पिंटू भोसले सचिव, संदिपान चव्हाण, बाबासाहेब एकतपुरे, सुभाष पवळ आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयाला स्वाभिमानी शेतकरी गायकवाड व म्हेत्रे यांच्यावतीने खुर्च्या व टीपॉय सप्रेम भेट.
Next articleसदाशिवनगर येथील महालक्ष्मी नवरात्र उत्सवातील महिलांना बाबासाहेब माने पाटील परिवाराकडून साड्यांचे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here