माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी प्रशासकीय बदल्यांची पारदर्शक प्रक्रिया केली पूर्ण
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांनी प्रशासकीय बदल्यांची प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण केलेली आहे. पंचायत समितीमधील आठ ग्रामसेवक व दोन ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.
ग्रामविकास अधिकारी एम. बी. मिटकल यांची खंडाळी वरून लवंग येथे तर ए. एल. सावळकर यांचे तांदुळवाडी पिलीव वरून खंडाळी येथे बदली करण्यात आली आहे. ग्रामसेवक श्रीमती एन. आर. आतार यांची तिरवंडी वरून कारूंडे, आर.पी. म्हसवडे तामशिदवाडी वरून जाधववाडी, आर. एल. जमदाडे पिरळे वरून तामशिदवाडी, व्ही. एस. मोरे यांची कारुंडेवरून शिंदेवाडी, एस. ए. बोराटे बांगर्डे वरून मारकडवाडी, एच. एस. वगरे जाधववाडीवरून पिरळे, एस. एल. गोरे मारकडवाडी वरून तांबेवाडी अशा प्रशासकीय बदल्या झालेल्या आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng