माळशिरस पंचायत समिती येथे शिव स्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

वाघोली (बारामती झटका)

आज दि. ६ जून रोजी पंचायत समिती माळशिरस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४८वा राज्यभिषेक दिन राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी व प्रशासक श्री. श्रीकांत खरातसाहेब यांच्या शुभहस्ते स्वराज्य गुढीचे व शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती शोभाताई साठे यांच्याही शुभहस्ते स्वराज्य गुढीचे व शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रगीत व विविध महाराष्ट्र गीते प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांनी सुरेख आवाजात सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी हलगी तुतारीच्या संगे ‘प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो’, असा जयघोष करण्यात आला.

शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल शिक्षण विभागाचे शिक्षक सरूडकर सर यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर विविध शिवकालीन मर्दानी खेळ दांडपट्टा, लाटीकटी, तलवारबाजी यांचे काळजाचा ठोका चुकविणारे लहान मुलांनी सादरीकरण करून शिवकालीन इतिहास जागृत केला.

यावेळी शिवछत्रपती महाराजांच्या जयजयकारने पंचायत समितीचा आवार दुमदुमून गेला. त्यानंतर माळशिरस तालुक्याचा पारंपारिक लेझीम हा खेळ खेळण्यात आला‌ त्यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी सहभाग घेऊन आनंद द्विगुणित केला. सदर कार्यक्रमास सर्व अधिकारी व कर्मचारी शिवकालीन पोषाख व भगवे फेटे परिधान करून उपस्थित होते.

सदर कार्यक्रमास जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. रणनवरे, पंचायत समीतीचे सर्व विभागाचे कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रशासनाधिकारी एम. आर. बुगड, बी‌. एच. कदम, पी. बी. सूर्यवंशी, आर. डी. राऊत यांनी पाहिले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसभासदांचे हित जोपासून संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी – बाबासाहेब माने
Next articleसाहित्य समाजमनाचा आरसा आहे – सुनेत्रा पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here