माळशिरस परिसरात धुलीवंदन सण उत्साही वातावरणात धुमधडाक्यात सुरू…

मटन दुकान, चिकन सेंटर, भाजी मंडई, नागरिकांची झुंबड.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस परिसरात धुलीवंदन उत्साही वातावरणात धूम धडाक्यात व शांततेत आनंदाने साजरा सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनासारख्या महाभयंकर साथीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. सण, उत्सव, यात्रा, जत्रा यावर शासनाने संसर्ग पसरू नये यासाठी बंदी घातलेली होती. सध्या कोरोना परिस्थिती निवळलेली असल्याने सर्व पहिल्यासारखे सुरू झालेले आहे. होळी पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजेच धुळवड साजरी केली जाते. या दिवशी गोरगरीब व श्रीमंत मनमुराद भोजनाचा व मद्याचा आस्वाद घेत असतात.

अनेक लोक एकत्र येऊन बोकड अथवा बकरा घेऊन वाट्यावर मटन घेत असतात. काही व्यापारी बोकड कापून ग्राहकांना किलोवर देत असतात. बोकडाचे मटण महाग झालेले आहे तरीसुद्धा, काही खवय्ये मटन नाहीतरी चिकनच्या दुकानाकडे आपोआप पाय वळवून आजचा धुळवड कार्यक्रम साजरा करीत आहेत. शेतकऱ्यांची ज्वारी, गहू, मका यांची काढणी झालेली आहे. शेतातील ऊस कारखान्याला गेलेला आहे. बागायतदार आणि मजूर दोघेही आनंदात आहेत. नोकरदार यांचे कायमच चांगले आहे. विशेष म्हणजे आज शुक्रवार आहे. या दिवशी अनेक लोक मांसाहार करीत असतात. त्यामुळे माळशिरस परिसरात सध्या मटन, चिकन खरेदी व दारू पार्सल यावर सर्वसामान्य नागरीक व जनता व्यस्त आहे सर्वकाही शांततेत सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहिला दिनाचे औचित्य साधून कराटे स्पर्धेत यश मिळविलेल्या महिला मुलींचा सन्मान.
Next articleRomanian Leu To Bitcoin Rate Today RON

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here