सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपअधीक्षक बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांची दमदार कामगिरी
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस पोलीस स्टेशन येथे दि. 13 /05/2022 रोजी भादवि कलम 307 अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर 283/2022 हा गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील जखमी मारुती बलभीम पवार वय 45 वर्ष रा. इस्लामपूर, ता. माळशिरस यांस जीवे मारण्याच्या उद्देशाने मौजे इस्लामपूर गावचे शिवारात दि. 12/05/2022 रोजी रात्री 12 वाजता ते 13/05/2022 रोजी पहाटे 05.30 पूर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले होते.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये गुन्ह्यातील जखमी मारुती बलभीम पवार यांची दुसरी पत्नी रेश्मा मारुती पवार वय 32 वर्ष रा. इस्लामपूर हिचे वर्तन संशयास्पद वाटत असल्याने तिच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता तिने तिचा प्रियकर विठ्ठल दत्तू हुलगे वय 21 रा. गोरडवाडी, ता. माळशिरस यास पतीचा काटा काढण्यासाठी सांगितले व त्याप्रमाणे आरोपी विठ्ठल हूलगे रा. गोरडवाडी यांनी दि. 15/05/2022 रोजी रात्री मारुती पवार शेतात पिकास पाणी देण्यासाठी गेले असताना तेथे जाऊन त्यास ठार मारण्याच्या उद्देशाने कळकाचे दांडक्याने डोक्यात व पायावर मारून गंभीर जखमी केले होते.
सदर गुन्ह्याचे तपास कामी आरोपी रेश्मा मारुती पवार इस्लामपूर, विठ्ठल दत्तू हुलगे गोरडवाडी यांना अटक करण्यात आले असून सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड हे करीत आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng