माळशिरस पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांची नव्याने नियुक्ती..
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी यांच्या दि. 4 मार्च 2023 रोजी बदल्या झाल्या असून, तशा सूचना सोलापूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी दिल्या आहेत.
माळशिरस तालुक्यातील अकलूज पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक अरुण शिवदास सुगांवकर यांची बदली आर्थिक गुन्हे शाखा सोलापूर येथे झाली आहे.
तर माळशिरस येथील पोलीस निरीक्षक दीपरतन गोरख गायकवाड यांची बदली अकलूज पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे. तर सोलापूर येथील नियंत्रण कक्ष येथील राजेंद्र रंगनाथ टाकणे यांची माळशिरस पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली आहे.
तर मंदिर सुरक्षा पंढरपूर येथील गोपाळ बासु पवार यांची बदली कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून झाली आहे. सोलापूर येथील नियंत्रण कक्ष येथील संतोष दत्तात्रय गिरीगोसावी यांची बार्शी पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे.
अकलूजचे पोलीस निरीक्षक अरुण सुगांवकर यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस मित्र संघटनेच्या मदतीने अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले. कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी विशेष प्रयत्न करून अकलूज पोलीस ठाणे हद्दीतील 32 गावात सुव्यवस्था अबाधित ठेवली. त्यामुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले. आपल्या कार्यकाळात त्यांनी दैदिय्यमान कामगिरी केली आहे.
तसेच माळशिरस पोलीस ठाणे येथील दीपरतन गायकवाड यांनी देखील माळशिरस येथे अतिशय चांगली कामगिरी केली आहे. अनेक गुन्हे उघडकीस आणून आरोपींना जेरबंद केले. तसेच इतरही अनेक विधायक कामे केली आहेत.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng