माळशिरस पोलीस स्टेशन व उड्डाणपूल संघर्ष समिती आणि पुरंदावडे सदाशिवनगर ग्रामस्थांची व सर्व पक्षीय नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न


उड्डाणपुलामुळे होणाऱ्या अडचणी राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहचायला पाहिजे, एवढाच आंदोलनाचा उद्देश, संघर्ष समितीचे अध्यक्ष सुर्यकांत उर्फ पोपटराव गरगडे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात यावं – पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड.

सदाशिवनगर ( बारामती झटका )

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील पुरंदावडे सदाशिवनगर दरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दोन्ही गावातील ग्रामस्थ, व्यापारी व स्थानिक नागरिक यांचे म्हणणे आहे की, उड्डाणपूल प्लेटऐवजी कॉलमचा करावा. यासाठी दोन्ही गावातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी उड्डाणपूल संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. पुरंदावडे व सदाशिवनगर ग्रामस्थ आणि उड्डाणपूल संघर्ष समितीचा दि. 23/07/2022 रोजी रास्ता रोको आहे.

या पार्श्वभूमीवर माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड व उड्डाणपूल संघर्ष समिती व पुरंदावडे, सदाशिवनगर ग्रामस्थांची व सर्व पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक संपन्न झाली.

यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष पुरंदावडे गावचे माजी उपसरपंच व ज्येष्ठ नेते सुर्यकांत उर्फ पोपटराव गरगडे यांनी सांगितले, प्लेटच्या उड्डाणपूलामुळे दोन्ही गावाचे अस्तीत्व धोक्यात येणार आहे. सर्व व्यापारी वर्गाचे व स्थानिक नागरिकांची अडचण लक्षात घेऊन सर्व पक्षीय नेत्यांची व कार्यकर्ते यांनी सर्वांनी मिळून रास्ता रोको आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

उड्डाणपुलामुळे होणाऱ्या अडचणी राज्य व केंद्र शासनापर्यंत पोहचायला पाहिजे, येवढाच उद्देश या आंदोलनाचा आहे. संघर्ष समितीचे अध्यक्ष पोपटराव गरगडे यांनी सांगितले.

माळशिरस पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की, आपल्या भावना जाणु शकतो. आपला उद्देश आंदोलनाचा चांगला आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून लोकशाही व सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात यावे. अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वांनी मिळून काळजी घ्यावी, अशा सूचना करून खेळीमेळीत बैठक संपन्न झाली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडायलॉगने सोशल मीडियावर परिचित असणारे आमदार शहाजीबापू पाटील यांचा होलार समाजाच्या वतीने सन्मान संपन्न.
Next articleओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल ओबीसी समाज आनंदी – प्रा. दादासाहेब हुलगे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here