माळशिरस मधील खंडोबा वस्ती येथील खंडोबा देवाच्या पूर्वीच्या मुर्त्या गाभाऱ्यामध्ये ठेवाव्या – सुमितभाऊ जानकर.

माळशिरस ( बारामती झटका )

चंपाषष्ठी निमित्त 58 फाटा खंडोबावस्ती येथे खंडोबाची भव्य यात्रा जय मल्हार तरुण मंडळ खंडोबा वस्ती यांनी माळशिरस नगरपंचायत चे नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख व माळशिरस पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दीप रतन गायकवाड यांच्या उपस्थितीत भरवण्यात आली होती. खंडोबा वस्ती येथील खंडोबा हा संपूर्ण माळशिरस गावचा खंडोबा आहे. माळशिरस गावामध्ये एकमेव खंडोबाचे मंदिर आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला माळशिरस मधून खंडोबा यात्रेसाठी मोठ्या संख्येने भावी भक्त येतात.

मागील दोन वर्ष कोरोनामुळे ही यात्रा साध्या पद्धतीने आयोजित करण्यात आले होते परंतु यावर्षी ही यात्रा भव्य स्वरूपात करण्यात आले होते या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले होते सदर यात्रेसाठी जेजुरी वरून ज्योत आणण्यात आले होते सदर यात्रा झाल्यानंतर चार डिसेंबर रोजी काही लोकांनी मंदिरातील मूर्ती काढून त्या ठिकाणी नवीन मूर्तीची स्थापना केली आहे व पहिले मूर्ती मागील बाजूस झाडाखाली उन्हात ठेवण्यात आले आहे.

मंदिरातील देव मागे जात नसतो तसाच तो उन्हात ठेवला आहे त्यामुळे तो देव परत देवळात आणावा असे लोकांमधून चर्चा होत आहे तसेच भक्तांच्या भावनाही त्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत काही लोकांनी मनाने असे कृत्य केलेले गावातील इतर ग्रामस्थांना मान्य नाही तरी पुढील चंपाषष्टीला या मूर्तीचे पुनर्व स्थापना करण्यात येणार असल्याचे सुमित भाऊ जानकर यांनी सांगितले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleउघडेवाडी सरपंच पदाची गवळी व भगत यांच्यात समोरासमोर लढत सर्व ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध.
Next articleमाळशिरस तालुक्यात मोहिते पाटील गट व पारंपारिक विरोधक तर काही ठिकाणी मोहिते पाटील समर्थक यांच्यात आमने सामने लढत लागलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here