माळशिरस मध्ये कृष्णा एंटरप्राइजेस इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भव्य दालनाचा शुभारंभ

आमदार राम सातपुते, अर्जुनसिंह मोहिते पाटील, ॲड. सोमनाथ वाघमोडे, ज्ञानदेव टेळे, आप्पासाहेब देशमुख, पांडुरंग वाघमोडे, विकासदादा धाईंजे, विवेकानंद पताळे संतोष सोनवणे,मान्यवरांच्या उपस्थितीत.

एम. बी. ए करून नोकरी न करता स्वतःचा उद्योग पन्नास हजारात सुरू केलेल्या व्यवसायाचे रोपटे पाच कोटी व्यवसायाच्या वटवृक्षात रूपांतर केलेल्या यशस्वी युवा उद्योजकाची यशोगाथा.


माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस शहरांमध्ये कृष्णा इंटरप्राईजेस इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या भव्य जालना चा शुभारंभ दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, लोणंद पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांची नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, ज्येष्ठ नेते ज्ञानदेव टेळे, माळशिरस नगरपंचायत चे माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष पांडुरंग वाघमोडे, आंबेडकरी चळवळीचे नेते विकासदादा धाईंजे, श्रीपूर येथील श्रीराम मशनरी चे उद्योजक विवेकानंद पन्हाळे, बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर संतोष सोनवणे, युवा नेते श्रीयश मुंडे आदी मान्यवरांसह अनेक मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.


माळशिरस शहरातील भारत सोपान कदम व सौ निर्मला भारत कदम यांचे परस्थिती बेताची होती हलाखीच्या परिस्थितीमध्ये उदरनिर्वाहासाठी त्यांनी किराणा व्यवसाय सुरू केलेला होता त्यांना दोन मुली व एक मुलगा सुरज अशी अपत्य आहेत. सुरज यांना लहानपणापासून आपल्या गरीब परिस्थिती ची जाणीव होती आई-वडिलांचे कष्ट समोर दिसत होतं अशा कठीण परिस्थितीत पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण माळशिरस प्रशाला माळशिरस येथे पूर्ण केले दहावीनंतर शिक्षणाचा खर्च वाढत असल्याने त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण बाहेरून घेतले. मुलांची शिक्षण यामुळे कदम परिवारांचे आर्थिक बजेट कोलमडत असत. अशा कठीण परिस्थितीत सुरज आपल्या आई-वडिलांना मदत म्हणून सेंट्रींग च्या कामावरही काम करून पैसे पैसे जमा केले होते आपण गावाच्या बाहेर पडल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही याची खूणगाठ बांधून सुरज यांनी पोलीस भरतीसाठी व स्पर्धा परीक्षेसाठी प्रयत्न केले मात्र मनाला ते पटत नव्हते आपला स्वतःचा व्यवसाय असावा त्यांनी कागल कोल्हापूर येथे एम आय डी सी मध्ये काही दिवस नोकरी केली त्यानंतर त्यांनी मार्केटिंग कंपनीमध्ये सेल्समॅन चे काम केले व कोल्हापूर येथील शिवाजी ईनवर सिटी मध्ये एम बी ए चे शिक्षण पूर्ण केले.

मार्केटिंग क्षेत्रामध्ये भरीव कार्य करायचे ठरवलेले होते अनुभवासाठी म्हणून त्यांनी बऱ्याच कंपन्यांमध्ये जॉब केले मनोमन त्यांना नोकरी करण्यामध्ये रस वाटत नव्हता त्यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यांच्याकडे कंपनी मध्ये काम केलेले 50 हजार रुपये होते त्यांनी मित्र परिवार व नातेवाईक यांचेकडून दोन ते अडीच लाख रुपये गोळा करून विकत कंपनीची एजन्सी घेतली.

व्यवसाय सुरू केल्यानंतर एजन्सीमध्ये मोठ्या पैशाच्या गुंतवणुकीची गरज लागणार आहे म्हणून त्यांनी बँकेचे कर्ज घेतले व्यवसाय सुरू केला गरीब परिस्थिती चे चटके बसलेले असल्याने व्यवसायामध्ये पूर्ण वाहून घेतलेले होते व्यवसायामध्ये प्रगती होत गेली आज त्यांच्याकडे सोलापूर व पुणे जिल्ह्यामध्ये पाच कंपन्यांची वितरणाची एजन्सी आहे. दोन जिल्ह्यांमध्ये 140 हून अधिक डीलर आहेत.
कृष्णा इंटरप्राईजेस दिवाळी पाडव्याला माळशिरस पुणे पंढरपूर रोडवर सुरुवात केलेली होती व्यवसाय मोठा झालेला असल्याने अपुरी जागा पडत होती त्यामुळे दसऱ्याला माळशिरस अकलूज रोडवर भव्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दालन सुरू केलेले आहे त्यामध्ये सर्व कंपन्यांचे टीव्ही फ्रिज कुलर वॉशिंग मशीन याच बरोबर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध राहणार आहे.


सुरज यांनी वडील भारत व मातोश्री निर्मला यांनी केलेल्या कष्टाचे चीज केलेले आहे गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतले प्रतिकूल परिस्थितीत 50 हजार रुपयापासून व्यवसायाला सुरुवात केलेली आज पाच कोटीवर व्यवहार गेलेला आहे. एम बी ए करून नोकरी न करता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करून व्यवसायाचे रोपटे लावून वटवृक्षात रूपांतर केलेल्या यशस्वी युवा उद्योजकाची यशोगाथा समाजातील अनेक उपेक्षित तरुणांनी घ्यावी प्रतिकूल परिस्थितीवर कार्यकर्तृत्व व आत्मविश्वासाच्या जोरावर यश व यशस्वी होता येते यश व यशस्वी होता येते हे सार ग्रुपचे इंडस्ट्रीचे C.E.O प्रवीण शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरज कदम यांनी दाखवून दिले .

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleस्वेरीच्या हर्षल रामगुडे यांची ‘हॅलो डॉक’ कंपनीमध्ये निवड, १० लाखांचे वार्षिक पॅकेज
Next articleउद्योग क्षेत्राने कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे -मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here