भारूड, किर्तन, रक्तदान शिबिर, महापूजा, अभिषेक, महाप्रसाद, तीन दिवस शिवशक्ती महाशिवरात्र यात्रा कमिटी यांचे सालाबादप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन
माळशिरस ( बारामती झटका )
शिवशक्ती महाशिवरात्र यात्रा कमिटी जाधववस्ती येळीव मायनर फाटा येथे सालाबादप्रमाणे महाशिवरात्री यात्रेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 22 वे वर्ष आहे.महाशिवरात्र यात्रेची सुरुवात सोमवार दि. 28/02/2022 ते बुधवार दि. 02/03/2022 पर्यंत महाशिवरात्र यात्रा सुरू राहणार आहे.जाधव वस्ती येथे महादेव मंदिरासमोरील भव्य पटांगणामध्ये यात्रा भरवण्यात येते.त्यानिमित्त सोमवार दि. 28/02/2022 रोजी सायंकाळी 08 ते 11 ह.भ.प. केंगार महाराज कण्हेर यांचे सोंगी भारुड होणार आहे.
महादेवाची महापुजा मंगळवार दि. 01/03/2022 रोजी सकाळी 06 ते 08 वाजेपर्यंत ह.भ.प. शरदकाका यांचे शुभहस्ते संपन्न होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये महारक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. दुपारी 3 ते 6 या वेळेत महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री 7 ते 9 या वेळेत ह.भ.प. मनोज महाराज शहा तुळशी ता. माढा यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. रात्री 9 ते 12 या वेळेमध्ये ह.भ.प. महादेव शेंडे महाराज पिसेवाडी यांचे सोंगी भारुड होणार आहे.

या सर्व कार्यक्रमास जाधववस्ती, कचरेवाडी, तिरवंडी, भांबुर्डी, मोटेवाडी येथील भजनी मंडळी सहभागी होणार आहेत. बुधवार दि. 02/03/2022 रोजी सकाळी 08 ते 11 वेळेत ह.भ.प. हनुमंत महाराज मारकड कात्रज, ता. करमाळा यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केलेला आहे. शिवशक्ती महाशिवरात्र यात्रा कमिटी जाधव वस्ती यांच्यावतीने कार्यक्रमाचे संयोजक शिवाजीराव सपकाळ यांनी सर्व भाविकांना उपस्थित राहून भव्य महाशिवरात्र यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng