माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी वडिलांना मुखाग्नी दिला..
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार एकनाथ भिकू देशमुख यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७४ व्या वर्षी गुरुवार दि. ०२/०३/२०२३ रोजी रात्री ११ वाजता उपचार घेत असताना दुःखद निधन झालेले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी वडीलांच्या चितेला शुक्रवार दि. ०३/०३/२०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता शोकाकुल वातावरणात मुखाग्नी दिला. यावेळी विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, राजकारण, अर्थकारण, समाजकारण, शिक्षण, कृषी, व्यावसायिक आदी क्षेत्रातील मंडळींसह विविध राजकीय व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, माळशिरस नगरपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी माळशिरस पंचक्रोशीतील नातेवाईक मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वर्गीय एकनाथ देशमुख यांची साधी राहणी व उच्च विचार सरणी होती. त्यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. शेती व्यवसाय करून आपला संसार फुलविलेला होता. त्यांच्यावर शुक्रवार दि. ०३/०३/२०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता माळशिरस ६१ फाटा येथील राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आलेले आहेत. मृत्यू झालेला दिवस धरलेला असल्याने उद्याच शनिवार दि. ०४/०३/२०२३ रोजी सकाळी ७ वाजता रक्षा विसर्जन तिसऱ्याचा कार्यक्रम होणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
