माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस शहरातील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना संसर्गजन्य गंभीर परिस्थितीत खातेदारांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून टाईमपास न करता, जेवण, चहा, बाथरूम वापर अशा बँकेच्या नियमात नसणाऱ्या गोष्टींवर जास्त वेळ जात आहे. त्यामुळे खातेदारांना प्रतीक्षा करत बँकेसमोर व रस्त्यावर बसण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे.
बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये अनेक शेतकऱ्यांची बचत गटाची खाते आहेत. शासनाची शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची खाती सुद्धा याच बँकेत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला या बँकेच्या व्यवहाराशी जास्त निगडित आहेत. बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी इतर वेळची गोष्ट वेगळी मात्र, कोरोनासारख्या महाभयंकर संसर्ग रोगाच्या प्रादुर्भावाला विलंबामुळे बळी पडू नयेत अशी अनेक खातेदारांची अपेक्षा आहे. त्यामुळे बँकेतील अधिकाऱ्यांनी कमी वेळेत जास्त खातेदारांचे व्यवहार करावेत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याकडे रिझर्व बँक, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी लक्ष द्यावे अशी जनतेची मागणी होत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng