माळशिरस येथील विलास मारुती देशमुख यांचे दुःखद निधन.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस ६१ फाटा येथील प्रगतशील बागायतदार विलास मारुती देशमुख यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १०/०४/२०२२ रोजी दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा दोन मुली, तीन बंधू, दोन बहिणी, सहा विवाहित पुतणे असा एकत्रित परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोकदादा देशमुख यांचे चुलते होते.

स्वर्गीय विलास मारुती देशमुख यांचे एकत्र कुटुंब आहे. सुसंस्कृत स्वभाव, साधी राहणी, स्वच्छ विचारसरणी असल्याने त्यांना समाजामध्ये आदराचे स्थान होते. सध्याच्या युगात ‘हम दो, हमारे दो’ अशी परिस्थिती असताना सुद्धा माळशिरस शहरातील आदर्श व एकत्र कुटुंब पद्धती असणारे देशमुख पट्टा ६१ फाटा या ठिकाणी असणारे हे कुटुंब आहे. तीन विवाहित बंधू, सहा पुतणे आहेत. सुना, नातसुना, नातवंडे, पतवंडे असे सर्वजण कुटुंबामध्ये सर्व आनंदाने व गुण्यागोविंदाने रहात आहेत. विलास देशमुख यांचा मृत्यू रामनवमी दिवशी झालेला आहे. रक्षाविसर्जन (तिसरा) १२/०४/२०२२ रोजी सकाळी ७ वाजता ६१ फाटा देशमुख वस्ती येथे होणार आहे. योगायोगाने महादेव एकादशी येत आहे. याचसाठी केला अट्टाहास, शेवटचा हा दिस गोड व्हावा, या म्हणीचा प्रत्यय मृत्यू व तिसऱ्याच्या कार्यक्रमादिवशी आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमेडीक्वीन मेडिको पेजेंट मिसेस महाराष्ट्र 2022 स्पर्धेचा तिसरा सीजन संपन्न
Next articleअमृतभैया माने देशमुख सोसायटीच्या निवडणुकीतील विजयाचे पडद्यामागील चाणक्य ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here