माळशिरस येथे ओंकार कलेक्शन रेडीमेड कपड्याच्या दुकानाचा भव्य शुभारंभ संपन्न झाला

लहुजी शक्ती सेना अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे व माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस नगरपंचायत हद्दीत पुणे-पंढरपूर रोडवर शहा धारसी जीवन पेट्रोल पंपाच्या शेजारी शिंदे कॉम्प्लेक्स येथे ओंकार कलेक्शन रेडीमेड कपड्याच्या दुकानाचे उद्घाटन लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले.

सुरुवातीस माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते तानाजीराव शिंदे, विठ्ठल रुक्मिणी जुनियर कॉलेजचे चेअरमन भाजपचे नेते नागेश मालक वाघमोडे, माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक कैलास वामन, नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक नंदूभाऊ लांडगे, आर पी आय तालुका अध्यक्ष धनाजी पवार, आरपीआय जिल्ह्याचे नेते रमेश धाईंजे, लहुजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष महादेव तुपसौंदर, योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष शेखरभाऊ खिलारे, पत्रकार सचिन रणदिवे आदी मान्यवरांसह माळशिरस पंचक्रोशीसह तिरवंडी गावातील आजी-माजी जेष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब सपताळे यांनी चिरंजीव ओंकार सपताळे यांना भव्य कपड्याचे शोरूम उभा करून दिलेले आहे. माळशिरस शहरामध्ये नेहमी गजबजलेल्या ठिकाणी ओंकार रेडीमेड कपड्याच्या दुकानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते केलेला आहे.

त्यामध्ये साडी, रेडिमेड, होजियरी, शर्ट, टी-शर्ट, जीन्स पॅन्ट, चिल्ड्रन्स वेअर अशी रेडीमेड कपडे मिळणार आहेत. ओंकार कलेक्शनमध्ये फक्त 999 मध्ये 3 जीन्स किंवा 999 मध्ये 3 शर्ट अशी खास ग्राहकांसाठी ऑफर ठेवलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेसचे महा अधिवेशन उत्साहात व जोशपूर्ण संपन्न झाले, तरुणाईची लक्षवेधी उपस्थिती…
Next articleबहुजन क्रांतीच्या रॅलीला माढा तालुक्यातून १०० कार्यकर्ते जाणार – महेंद्र सोनवणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here