माळशिरस येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू.

कर्मचारी न्याय हक्कासाठी भर उन्हात आंदोलन सुरू आहे, तर वरिष्ठ अधिकारी एसी व पंख्याची हवा खात निर्धास्त…

माळशिरस ( बारामती झटका )

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद, कामगार युनियनचे सोलापूर जिल्ह्याचे मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समिती समोर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन दरानुसार गेल्या अठरा महिन्यापासून 14125/- ते 11625/- रुपये वेतन ग्रामपंचायतीकडून मिळत नसून कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कामगारांना ऑगस्ट 2020 पासून मंजूर झालेले किमान वेतन व राहणीमान भत्ता त्याचा मागील फरक मिळावा या मागणीसाठी सोमवार दि. 4/4/2022 पासून सोलापूर जिल्ह्यातील कामगार युनियनच्या वतीने बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. माळशिरस पंचायत समितीच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन जिल्हा उपाध्यक्ष किसन सूळ, जिल्हा सरचिटणीस दादा होडगे, तालुका सचिव तानाजी धुमाळ, सहसचिव संजय मगर, संघटक नाथा लाला भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहेत. यावेळी माळशिरस तालुका अध्यक्ष नितीन सावंत, सचिव प्रशांत थोरात, कार्याध्यक्ष आनंदराव केंगार, उपाध्यक्ष राजकुमार देठे, विजय बोडरे, प्रसिद्धीप्रमुख किरण काळे, तालुका संघटक सोमनाथ देशमुख यांच्यासह तालुक्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित दराने किमान वेतन लागू करणे, सोलापूर जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायती कामगार विभागाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे किमान वेतन व राहणीमान भत्ता विशेष भत्ता देत नाहीत व आपल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या ग्रामपंचायतीची तपासणी करून त्या ग्रामपंचायतीवर कारवाई करावी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून ज्या ज्या वेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या दरात सुधारणा करण्यात येईल त्या त्या वेळी सुधारित किमान वेतनाचे दर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना लागू करावे, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सध्या जमा होत असलेले वेतन 11625/- 14125/-मधून कपात करून उर्वरित वेतन ग्रामपंचायतीने ग्रामनिधीतून द्यावे, अशा आशयाचे निवेदन तयार केलेले आहे. उन्हाची तीव्रता असतानासुद्धा कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद व धरणे आंदोलन सुरू आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरसमधील अहिल्यादेवी चौक बनला मृत्यूचा सापळा, प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.
Next articleप्रांत कार्यालयातील अजित जाधव यांचा पदभार काढला तर पल्लवी शिंदे यांना काढून टाकले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here