माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिनानिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून माळशिरस येथे भव्य रक्तदान शिबिर व महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन दि. ८ मार्च २०२२ रोजी धन्वंतरी हॉस्पिटल माळशिरस येथे सकाळी १० ते ५ या वेळेत करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन जगदीश निंबाळकर तहसीलदार, माळशिरस आणि दिलीप धोत्रे मनसे नेते यांच्याहस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम दिपरतन गायकवाड पोलीस निरीक्षक माळशिरस, सौ. भाग्यश्री बेडगे कार्यालय अधीक्षक माळशिरस नगरपंचायत, डॉ. स्मिता शिंदे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय माळशिरस, आप्पासाहेब कर्चे माढा लोकसभा अध्यक्ष, आप्पासाहेब टेळे नेत्र तज्ञ माळशिरस, सौ. रेश्मा टेळे नगरसेविका माळशिरस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन सुरेश टेळे मनसे माळशिरस तालुका अध्यक्ष यांनी केले आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे व महिलांनी मोफत हिमोग्लोबिन तपासणी करून घ्यावे असे आव्हान सुरेश टेळे यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng