माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्रातील ठाकरे सरकार यांच्या निष्क्रिय कारभार तसेच मागासवर्गीय व बहुजन समाजातील न्याय हक्कासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य सरचिटणीस व सोलापूर जिल्ह्याचे आंबेडकरी चळवळीतील आक्रमक, धुरंधर नेतृत्व, चळवळीचा स्वाभिमान, रिपब्लिकन पक्षातील युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात तहसिल कार्यालयासमोर रिपाइंच्यावतीने सकाळी ११ वाजता आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ भोसले व माळशिरस तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे यांनी दिली आहे.
माळशिरस तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी उद्या माळशिरस तहसिल कार्यालय येथे येऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुका अध्यक्ष नरेंद्र भोसले सर यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावरची लढाई नवीन नाही. मागासवर्गीय अनुशेष भरावा, पाच एकर जमीन कसायला मिळावी, एकोणीचशे एकवीस पुर्वीच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता मिळावी, तसेच मराठा व ओबीसीना आरक्षण द्यावे, रेल्वे जागेवरील झोपड्यांना परवानगी द्यावी, या व इतर मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले साहेब यांची तळागाळातील सर्व घटकांना न्याय मिळावा, ही भुमिका पहिल्यापासून आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, ही मागणी व भुमिका सर्वप्रथम आठवले साहेब गेल्या अनेक वर्षांपासून मांडत आहेत. त्यांचा लढा केवळ मागासवर्गीय यांच्यासाठीच नाही तर सर्व बहुजन उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. मराठा धनगर ओबीसी यांचे न्याय हक्कासाठी ते सदैव आग्रही राहिले आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng