माळशिरस येथे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ चे आयोजन

राजा श्री शिवछत्रपती चषक २०२३ भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस येथे शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त दि. १८, १९ आणि २० या तीन दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गोपाळराव देव प्रशालेमध्ये बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कॅश प्राईज १५, ट्रॉफी २० आणि मेडल १५ अशी बक्षिसे असणार आहेत. सर्वात लहान खेळाडू ट्रॉफी, सर्वात ज्येष्ठ खेळाडू ट्रॉफी, उत्कृष्ट पालक ट्रॉफी असे स्वरूप असणार आहे.

रविवार दि‌. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता तहसील कार्यालयासमोर शिखर शिंगणापूर येथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात येईल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता माळशिरस शहरातून भव्य मोटार सायकल रॅली तसेच महापुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात येणार आहे. तर सोमवार दि. २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर भव्य मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावेळी विविध मार्गाने खेळ ढोल, ताशा आणि हलगी या पारंपारिक वाद्यांच्या गजरात सादर करण्यात येणार आहे. यावेळी पंचशील ढोल पथक, फलटण प्रमुख आकर्षण असणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअनारोग्यकारक जीवनशैली व तणावामुळे हृदयविकारात वाढ
Next articleकरमाळा अर्बन बँकेचे नूतन संचालक चंद्रकांत चुंबळकर यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून सत्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here