अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व सोयींनी उपयुक्त असणाऱ्या हॉस्पिटलचा होणार शुभारंभ
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे म्हसवड रोड येथे स्टार आय.सी.यु. अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन समारंभ प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार आणि हृदयरोग तज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय मामा भरणे, विधान परिषदेचे सदस्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा मतदार संघाचे सदस्य आमदार राम सातपुते, विधान परिषदेचे माजी सदस्य ॲड. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ॲड. सुभाष पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर आदी मान्यवरांच्या शुभहस्ते रविवार दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दु. २ वा. होणार आहे.
या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगरचे व्हाईस चेअरमन ॲड. मिलिंद कुलकर्णी, उपनगराध्यक्ष मारुतीराव पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य तुकाराम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष माणिक बापू वाघमोडे, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव सिद, माळशिरस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विष्णुपंत केमकर, पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने, नगरसेवक आबा धाईंजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेशभाऊ पाटील, आय. एम. ए. अकलूजचे अध्यक्ष डॉ. संतोष खडतरे, माळशिरस बार असोसिएशनचे सदस्य ॲड. प्रवीण वाघमोडे, एन.आय.एम.ए. माळशिरसचे अध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. पृथ्वीराज माने पाटील, माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर, माळशिरस नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, माळशिरस ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ. सौ. स्मिता शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

स्टार आयसीयू अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे तालुक्यातील रूग्णांना बाहेर जाण्याची गरज नाही. कारण, हे हॉस्पिटल आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. डॉ. शैलेश गायकवाड डी. एन. बी. मेडिसिन, डॉ. चिराग व्होरा चेस्ट फिजिशियन, डॉ. अनिल पाटील, डॉ. सचिन देशमुख, डॉ. पंकज नलवडे, डॉ. नितीन सिद, डॉ. नितीन वाघमोडे, डॉ. सचिन केमकर यांनी हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून जास्तीत जास्त नागरिकांनी या हॉस्पिटलच्या सोयींचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng