माळशिरस येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने फळे वाटप

माळशिरस (बारामती झटका )

शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना मोफत फळे वाटप करून बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने जयंती साजरी करण्यात आली.

बाळासाहेबांची शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संतोष आबा वाघमोडे यांच्या संपर्क कार्यालयात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदुहृदय सम्राट यांच्या जयंती निमित्त समाजातील सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांना हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण व्हावी व समाजामध्ये सामाजिक कार्याची जनजागृती व्हावी हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून जयंती साजरी करून रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला बाळासाहेबांनी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगरसेवक संतोषआबा वाघमोडे, शिवसेना नेते माजी नगरसेवक सुरेशआबा वाघमोडे, माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक जगन्नाथ गेजगे, शिवसेना वैद्य मदत कक्ष तालुका समन्वयक बापूराव क्षीरसागर, संजयआप्पा जमदाडे, अस्लम मुजावर, योगेश पुराणिक, बाळासाहेब वाघमोडे, यशवंत मोहिते, बापूराव वाघमोडे, ज्ञानदेव वाघमोडे, निलेश शिंदे आदी मान्यवरांसह माळशिरस ग्रामीण रुग्णालयमधील डॉक्टर, नर्स, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुक्याच्यावतीने एक दिवसीय कार्यकर्ता शिबिर संपन्न
Next articleमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला झटका, बोगस ५२ शिक्षक केले निलंबित,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here