स्वर्गीय रस्तुम संभाजी वाघमोडे यांचे प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन व पुष्पवृष्टी कार्यक्रम.
माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील प्रगतशील बागायतदार स्वर्गीय रस्तुम संभाजी वाघमोडे यांचे प्रथम पुण्यस्मरण बुधवार दि. 02/03/2022 रोजी आहे. त्यानिमित्त ह.भ.प. विठ्ठल महाराज पैठणकर यांचे सुश्राव्य किर्तन सकाळी 10 ते 12 या वेळेत होणार आहे. 12 वाजता स्वर्गीय रस्तुम वाघमोडे यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्र परिवार नातेवाईक यांनी सदरच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन धर्मपत्नी श्रीमती यमुनाबाई व चिरंजीव श्री. भाऊसाहेब, हनुमान, मधुकर यांच्यासह वाघमोडे परिवारांच्यावतीने करण्यात आलेले आहे.

रस्तुम संभाजी वाघमोडे यांचा जन्म सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबामध्ये दि. 01/01/1946 रोजी तिरवंडी येथे झालेला आहे. यांचा शुभविवाह यमुनाबाई यांच्याशी झालेला होता. त्यांना तीन मुले भाऊसाहेब, हनुमंत, मधुकर आणी तीन मुली अशी अपत्ये आहेत. परिस्थिती अतिशय नाजूक व बेताची होती कष्ट करून पती-पत्नी दरिद्री प्रपंचाचे स्वर्गात रुपांतर केले होते. मुलं मोठी झाल्यानंतर परिस्थितीची जाणीव असल्याने कर्तबगार निघाली. त्यांनी उद्योग व्यवसायामध्ये माळशिरस पंचक्रोशीत नाव कमावलेले होते. झेरॉक्स व्यवसाय नियोजन बद्ध करून वाघमोडे झेरॉक्स वाले अशी त्यांची ओळख झालेली आहे. आजही त्यांचा झेरॉक्सचा व्यवसाय आहे. त्याच बरोबर परमीटरूम, खडी क्रेशर शेतामध्ये आंबा, डाळिंब चिकू, अशा फळबागांना सह इतर पिके असतात. रुस्तुम वाघमोडे यांचा नातू भाऊसाहेब वाघमोडे यांचे चिरंजीव डॉक्टर झालेले आहेत. आपल्या नातवाच्या दवाखान्याच्या उद्घाटनाला रस्तुम वाघमोडे उपस्थित होते. गेल्यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुस्तुम वाघमोडे यांचे दुःखद निधन झालेले होते. प्रतिकूल परिस्थितीत कष्टाच्या जीवावर संसार उभा केला. मुलांचा व नातवांचा संसार रस्तुम वाघमोडे यांना पाहता आला. आपण केलेल्या कष्टाचे चीज झाले, असे त्यांच्या दैनंदिन जीवनातील वागण्यावरून वाटत होते. मात्र काळाने घाला घातला आणि वाघमोडे परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळून बघता बघता वर्ष पूर्ण होत आलेले आहे. वाघमोडे परिवार यांचेकडून प्रथम पुण्यस्मरण निमित्त किर्तन पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे असे वाघमोडे परिवार यांच्या वतीने आवाहन केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng